हवामान बदल... जागो जागी कचरा.. नागरिक त्रस्त

रविंद्र खरात
सोमवार, 19 जून 2017

कल्याणः पाऊस सुरु झाला मात्र त्याने अनेक दिवस दांडी मारल्याने हवामान मध्ये बदल झाल्याने शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये, घसा खवखवणे, घसा दुखने, सर्दी, खोकला, व्हायरल ताप, ताप रुग्ण सर्वाधिक असून बाह्यरुग्ण विभागात 70 टक्के हेच रुग्ण दिसून येत आहेत. प्रौढांप्रमाणेच लहान मुलेही या संसर्गामुळे त्रस्त झाली आहेत. हवामानातील बदलामुळेच यंदा रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता वर्तविन्यात येत आहे.

कल्याणः पाऊस सुरु झाला मात्र त्याने अनेक दिवस दांडी मारल्याने हवामान मध्ये बदल झाल्याने शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये, घसा खवखवणे, घसा दुखने, सर्दी, खोकला, व्हायरल ताप, ताप रुग्ण सर्वाधिक असून बाह्यरुग्ण विभागात 70 टक्के हेच रुग्ण दिसून येत आहेत. प्रौढांप्रमाणेच लहान मुलेही या संसर्गामुळे त्रस्त झाली आहेत. हवामानातील बदलामुळेच यंदा रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता वर्तविन्यात येत आहे.

जून महिन्यात पाऊसाला सुरुवात झाली पाहिजे तशी हजेरी ही लावली मात्र त्याने अनेक दिवस दांडी मारल्याने सद्या दिवसभर कडक ऊन  पडत आहे. त्यामुळे वातावरणात पूर्णपणे बदल झाला आहे. यामुळे व्हायरल ताप, ताप, डोकेदुखी, घसा दुखने, घसा खवखवने, सर्दी, आदि रुग्ण वाढले आहेत.  अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत नाही. पण घरी पथ्यपाणी व औषधोपचाराने चार-पाच दिवसात आजार बरा होतो, हलका ताप, घशात खवखवणे, अन्नाचा घास गिळताना त्रास होणे आणि आवाजात बदल होणे यासारख्या समस्या नागरिकांना भेड़सावत आहे.

कल्याण पूर्व सहित कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत अर्धवट नाले सफाई झाली असून पालिकेने नाले आणि गटारे साफ केले मात्र नाल्याच्या किनारीच कचरा टाकल्याने नागरिकांच्या आरोग्यास घातक आहे. अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते दुरुस्त झालेच नाही, यामुळे डांस वाढल्याची तक्रार असून 1 जून पासून पालिकेच्या हद्दीत उघड़यावर म्हणजे हातगाडी वर विक्री बंदी हवी मात्र, भुर्जी पाव, वडा पाव, इडली, डोसा, चायनीज खुले आम सुरु असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळन्याचा पालिका करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत 2 रुग्णालय आणि 13 आरोग्य केंद्र असून 1 जून ते 16 जून 2017 पर्यन्त साथ रोगाचे रुग्णाची संख्या संशयित कॉलरा 1, गेस्ट्रो 45 ,काविळ 29, टायफाइड 36, मलेरिया 16, डेंग्यू 1, ताप रुग्ण 2994, स्वाइन प्लु 3 यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समजते. मागील वर्षा पेक्षा ही आकड़े वारी कमी असली तरी, हवामान असेच आठ दिवस राहिले तर ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पालिकेच्या वतीने घरोघरी सर्वे केला जात असून नागरिकांचे प्रबोधन ही केले जात आहे, नुकतेच खासगी ड़ॉक्टरांची पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने कार्यशाळा घेत सूचना दिल्याचे समजते.

प्रतिक्रिया -
ही तर सुरुवात आहे, हवामान बदल मुळे घसा दुखने, सर्दी, खोकला, व्हायरल ताप रुग्ण वाढले आहेत, सरकारी यंत्रणा आपली जबाबदारी पार पाडत असते त्यानुसार नागरिकांनी ही पुढाकार घेतला पाहिजे घरातील ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करूनच कचरा कुंडीत फेकला पाहिजे असे मत कल्याण मधील प्रसिध्द डॉक्टर विवेक भोसले यांनी व्यक्त केले.

मागील वर्षा पेक्षा यावर्षी साथ रुग्ण कमी आहेत, पालिका हद्दीत नुकतीच कार्यशाळा घेतली, साथ रुग्ण दाखल झाल्या झाल्या पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला सूचना द्यावी, पालिकेच्या रुग्णालय मध्ये मुबलक औषध साठा उपलब्ध असून कोणत्याही खासगी डॉक्टर ने साथ रोग रुग्ण मयत झाल्यास त्वरित घोषित करु नये, त्या आजाराची शहानिशा करावी यासाठी पालिकेची मद्त घ्यावी अन्यथा कायदेशीर कार्रवाई केली जाईल अशी माहिती पालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी ड़ॉ स्मिता रोड़े यांनी दिली.

Web Title: kalyan news rain, health and hospital issues