कल्याणः मुसळधार पावसात शहाड रेल्वे स्थानकात सुरक्षा अभियान

रविंद्र खरात
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

कल्याणः मुसळधार पाऊस सुरू असताना आज (बुधवार) सकाळी शहाड रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे लोहमार्ग पोलिस आणि कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे सुरक्षा अभियान राबविण्यात आले.

कल्याणः मुसळधार पाऊस सुरू असताना आज (बुधवार) सकाळी शहाड रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे लोहमार्ग पोलिस आणि कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे सुरक्षा अभियान राबविण्यात आले.

शहाड रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासन ने पादचारी पूल बांधून ही रेल्वे प्रवासी रूळ ओलांडून प्रवास करतात यामुळे अपघातांची संख्या सर्वात जास्त आहे. आज सकाळी 9 ते 11 या कालावधीत शहाड रेल्वे स्थानकात सुरक्षिततेबाबत उद्घोषणा सुरू होत्या व त्यातूनही प्रवासी बांधवांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाचे राजेश घनघाव, श्याम उबाळे, विशाल जाधव, राहुल दोंदे, चंद्रकांत जाधव, सचिन घेगडे, आनंता ढोणे, अनिल ञिपाठी, चंद्रकांत वाढविंदे, महेश तारमाळे, सचिन जाधव यांच्या समवेत रेल्वे स्थानकातील सीएनसी राजाराम, सुरक्षा बलाचे एसआयपीएफ अरविंदकुमार व रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तडवी समवेत अनेकांनी या अभियान मध्ये सहभाग घेतला. मुसळधार पाऊस सुरू असताना प्रवासी वर्गाचे प्रबोधन करण्यात आले.

शहाड स्थानकात प्रामुख्याने आस्वच्छता, अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा, छप्पर गळती, पार्किंग समस्या यामुळे हे स्थानक बकाल झाले आहे. दिवसाला या स्थानकातून रेल्वेला 10 लाख रुपयांचे उपन्न मिळते. मात्र, सुविधांचा बोजवारा उडाला आहे. यामुळे प्रवासी वर्ग त्रस्त असल्याचे रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकारी वर्गाने रेल्वे अधिकारी वर्गाचे लक्ष्य वेधले. गर्दीच्या वेळी लोकल मधील दरवाज्यात उभे राहून प्रवासी वर्गाला आत जाऊन न देणे, फेरीवाल्यावर कारवाई, पाकीटमारावर कारवाई, रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागण्या यावेळी प्रवासी संघटनेकडून करण्यात आल्या.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: kalyan news Security campaign in Shahad railway station