विक्री होईल तेवढीच मिठाई दुकानात ठेवा: सहआयुक्त सुरेश देशमुख

रविंद्र खरात
रविवार, 30 जुलै 2017

पावसाळा सुरु असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून अनेक सण सुरु होतात. रक्षाबंधन, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी असे सण लागोपाठ आहेत या काळात मिठाईच्या गोड पदार्थाला कल्याण डोंबिवली सहित अनेक शहरात मोठ्या प्रमाणात मागणी असते. म्हणून या सणाचा फायदा घेत भेसळयुक्त मिठाई , विक्री करतात यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो.

कल्याण : रक्षाबंधन ते दिवाळी या सणाच्या दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने दिवाळी सणासाठी येणा-या भेसळयुक्त पदार्थावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध शहरात जावून व्यापारी वर्गाचे प्रबोधन केले जात असून त्यांची कायद्याची माहितीसाठी कार्यशाळा आयोजित केली जाणार असून तदनंतर भेसळ करण्याऱ्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याच्यी माहिती अन्न व औषध कोकण विभाग सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी दिला दिली आहे.

पावसाळा सुरु असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून अनेक सण सुरु होतात. रक्षाबंधन, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी असे सण लागोपाठ आहेत या काळात मिठाईच्या गोड पदार्थाला कल्याण डोंबिवली सहित अनेक शहरात मोठ्या प्रमाणात मागणी असते. म्हणून या सणाचा फायदा घेत भेसळयुक्त मिठाई, विक्री करतात यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो. यासाठी अन्न व औषध कोकण विभाग सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या आदेश नुसार अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय कडगे, अन्न सुरक्षा अधिकारी बी. सी. वसावे, कल्याण डोंबिवली टिटवाला मध्ये मिठाई विक्रेता व्यापारी संघाचे पदाधिकारी , छोटे मोठे व्यापारी वर्गाची बैठक घेवून माहिती दिली. सणाचा दिवसात विक्री होईल तेवढ़ी मिठाई उत्पादन आणि साठा करावा, भेसळ होणार नाही याबाबत काळजी घ्या आणि दुकानदाराना सांगा, स्वच्छता ठेवा, नागरिकांच्या आरोग्याला घातक होईल असे पदार्थ बनवू नका असे आवाहन करण्यात आले. कल्याणमध्ये लवकरच व्यापारी, छोटे मोठे दुकानदार यांची कार्यशाळा घेण्यात येणार असून समस्या ही दूर करण्यात येणार असून अन्न सुरक्षा कायद्याबाबत ही माहिती देण्यात येणार आहे.

रक्षाबंधन ते दिवाळी या दरम्यान भेसळयुक्त पदार्थ विक्री करून नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचु शकतो यामुळे व्यापारी वर्गात प्रबोधन व्हावे यासाठी आमचे अधिकारी विविध शहरात जावून बैठका घेत असून माहिती देत असून 1 ऑगस्ट पासून कार्यशाळा सोबत विशेष पथका मार्फ़त धड़क कारवाई राबविणार असल्याची माहिती अन्न व औषध कोकण विभाग सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली.

Web Title: Kalyan news sweet in feativals