वाहन चालविताना नियमांचे पालन करा: पोलीस उपायुक्त अमित काळे

रविंद्र खरात 
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

एनएसएस युनिट बिर्ला कॉलेज आणि वाहतूक विभाग ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक जनजागृती कार्यक्रम कल्याणमधील बिर्ला कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठवर बिर्ला कॉलेजचे प्राचार्य डॉ नरेशचंद्र, डॉ स्वप्ना समेळ, डॉ महादेव यादव, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड ,पोलीस निरीक्षक संभाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

कल्याण: प्रत्येक माणसाच्या जीवनात वेळ मूल्यवान आहे. परंतु जीवन ही अमूल्य आहे, यामुळे प्रत्येकाने वाहन चालविताना नियमांचे पालन करत वाहन चालविल्यास त्याचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास होईल असे प्रतिपादन, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी एका कार्यक्रमात केले. 

एनएसएस युनिट बिर्ला कॉलेज आणि वाहतूक विभाग ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक जनजागृती कार्यक्रम कल्याणमधील बिर्ला कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठवर बिर्ला कॉलेजचे प्राचार्य डॉ नरेशचंद्र, डॉ स्वप्ना समेळ, डॉ महादेव यादव, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड ,पोलीस निरीक्षक संभाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सुरक्षित प्रवास आणि सुखकर प्रवास कसा करता येईल यावर आपल्या भाषणात प्रकाश टाकला. विद्यार्थी वर्गाने वाहनाचे शिकाऊ अथवा पक्के  लायसन्स घेताना काळजी घ्यावी, दलालामार्फत लायसन्स न घेता रीतसर वाहनचालकांसाठी जी परीक्षा घेतली जाते, ती परीक्षा देवुनच लायसन्स मिळवा असे आवाहन काळे यांनी करत पुढे म्हणाले की, प्रत्येक माणसाच्या जीवनात वेळ मूल्यवान आहे तेवढेच जीवन ही अमूल्य आहे यासाठी वाहन चालविताना सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. दुचाकी चालविताना हेल्मेट घाला तर कार चालविताना सीट बेल्ट लावा असे आवाहन करत हेल्मेट आणि सीट बेल्टचे महत्व आपल्या भाषणातून विद्यार्थ्याना सांगितले. 

यावेळी स्वागतीय भाषणात प्राचार्य डॉ नरेशचंद्र यांनी सांगितले, की कॉलेजमध्ये विद्यार्थी दुचाकी ने येत असेल तर त्याला हेल्मेट शिवाय प्रवेश देऊ नये असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढली असून त्यामुळे वाहतूक कोंडी ही होत आहे, ही वाहने सर्वात जास्त तरुण पिढी चालवीत असून त्यांनी नियमांचे पालन केले पाहिजे बिना लायसन्स, हेल्मेट न घालणे, हे चुकीचे असून जास्तीत जास्त तरुण पिढीने नियमांचे पालन करत दुसऱ्याना ही याबाबत प्रबोधन केले पाहिजे असे आवाहन यावेळी डॉ नरेश चंद्र यांनी केले. यावेळी वाहतूक नियम, त्याचे फायदे, नियम तोडल्यास नुकसान काय होते हे पथनाट्य आणि गीता मधून विद्यार्थी वर्गाने जनजागृती केली हे ही आकर्षण ठरले तर 300 हुन अधिक विद्यार्थी वर्गाने या कार्यक्रमात सहभाग घेतला.

Web Title: Kalyan news traffc rules