कोंडीचे कल्याण, नागरिक झाले बेहाल

रविंद्र खरात 
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

दुष्काळ मध्ये तेरावा महिना ...
कल्याण अहमदनगर महामार्गावरील वरप गावातील एका खासगी शाळेचा ओपन डे असल्याने तेथे वाहनाची संख्या वाढली आणि त्या रस्त्यातच पार्क केल्याने कांबा ते शहाड पुलावर सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजे पर्यंत वाहनाची भलीमोठी रांगा लागल्या होत्या. यामुळे बाहेर गावावरुन येणाऱ्या एसटी बसेस, शाळकरी बसेस, त्या कोंडीमध्ये अडकल्या होत्या.

कल्याण : कल्याण मधील प्रमुख रस्ते आणि पुलावरील रस्त्यात पडलेले खड्याने आज (शनिवार) शहरातील अनेक भागात सकाळ दुपारी वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालक सहित नागरिकांचे हाल झाले. 

कल्याण पश्चिममधील वालधुनी पुल आणि परिसर रस्त्यात पडलेल्या खड्डयाने वाहनाचा वेग कमी झाल्याने शनिवार ता 12 रोजी सकाळी 11 वाजल्या पासून कल्याण मुरबाड रोड, वालधुनी पुल, बिर्ला कॉलेज रोड, शिवाजी चौक आदी परिसरामध्ये वाहनाच्या लांब लचक रांगा लागल्याने वाहतुक कोंडी झाली होती. संथ गतीने वाहन चालत असल्याने वाहन चालक सहित नागरीक हैरान झाले होते. लांब लचक वाहनाची रांग पाहुन अनेकांनी रिक्षा, बस रस्त्यात सोडून एक ते दोन किलोमीटर पायपिट करत कल्याण रेल्वे स्थानक गाठले तर दूसरा शनिवार आणि रविवार असल्याने अनेक जण फिरण्यासाठी बाहेरगावी निघतात. त्यामुळे वाहनाची संख्या ही वाढल्याने शहरात वाहतुक कोंडीचे प्रमाण दिवसेदिवस वाढले आहे. 

दुष्काळ मध्ये तेरावा महिना ...
कल्याण अहमदनगर महामार्गावरील वरप गावातील एका खासगी शाळेचा ओपन डे असल्याने तेथे वाहनाची संख्या वाढली आणि त्या रस्त्यातच पार्क केल्याने कांबा ते शहाड पुलावर सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजे पर्यंत वाहनाची भलीमोठी रांगा लागल्या होत्या. यामुळे बाहेर गावावरुन येणाऱ्या एसटी बसेस, शाळकरी बसेस, त्या कोंडीमध्ये अडकल्या होत्या. यामुळे वाहनचालक सहित नागरिकांचे चांगलेच हाल झाले. शहाड पुल परिसर, म्हारळ नाका, वरप परिसरामधील रस्त्यात पडलेले भले मोठे पडलेले खड्डे पाहुन हा रस्ता गावातील की महामार्ग आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. खड्डे त्यात वाहतुक कोंडीने दुष्काळामध्ये तेरावा महिन्यागत वाहन चालकांची गत झाली होती. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. 

महिन्यातील दूसरा शनिवार असल्याने वाहनाची संख्या वाढली होती. रस्त्यात खड्डे यामुळे वाहनाची वेग मर्यादा कमी झाल्याने वाहतुक कोंडी झाली होती. दूसरीकडे वरप गावातील एका खासगी शाळेचा ओपन डे होता. त्यामुळे तेथील कोंडीचा परिणाम कल्याणमधील वाहतुकीवर झाला, अशी माहिती कल्याण वाहतुक शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांनी सकाळला दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: kalyan news traffic in kalyan