कल्याण: यापुढे जशास तसे उत्तर देवू; वाहतूक पोलिसांचा इशारा

रविंद्र खरात
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

आमिर शेख (23) नावाच्या युवकाची मोटारसायकल नो पार्किंगमध्ये पार्क केलेली मोटारसायकल वाहतूक शाखेच्या टोइंग वाहनाने बुधवारी उचलून नेली होती. आमिर शेख हा आपल्या दोन मित्रा समवेत कल्याण वाहतुक शाखेच्या कार्यालयामध्ये रात्री पावणे अकराच्या सुमारास गेला होता. ती गाड़ी सोडविण्यासाठी तेथील पोलिस नाईक अनिल लोहारे यांनी ती मोटार सायकल सोडविण्यासाठी 300 रूपयांचा दंड मागितला. याचा मनात राग धरून आमिर शेख याने क़ाय का 300 रुपये असा सवाल करत तुम लोगो का बहोत नाटक हो गया, मै कौन हूं तुमको दिखाता हू, असे म्हणत पोलिस नाईक अनिल लोहारे यांना बेदम मारहाण केली.

कल्याण : वाहतुक पोलिसावर रस्त्यात अथवा कार्यालय मध्ये येवून मारहाण करणाऱ्याची गय केली जाणार नाही. वाहतूक पोलिसांच्या स्वरक्षणासाठी त्यांच्या हातात यापुढे बॅटन (लाकडी दांडके) देण्याचा निर्णय घेतला असून, बेशिस्त वाहन चालकांना जाग्यावर उत्तर मिळेल, अशी माहिती कल्याण वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबजी आव्हाड यांनी सकाळला दिली.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार आमिर शेख (23) नावाच्या युवकाची मोटारसायकल नो पार्किंगमध्ये पार्क केलेली मोटारसायकल वाहतूक शाखेच्या टोइंग वाहनाने बुधवारी उचलून नेली होती. आमिर शेख हा आपल्या दोन मित्रा समवेत कल्याण वाहतुक शाखेच्या कार्यालयामध्ये रात्री पावणे अकराच्या सुमारास गेला होता. ती गाड़ी सोडविण्यासाठी तेथील पोलिस नाईक अनिल लोहारे यांनी ती मोटार सायकल सोडविण्यासाठी 300 रूपयांचा दंड मागितला. याचा मनात राग धरून आमिर शेख याने क़ाय का 300 रुपये असा सवाल करत तुम लोगो का बहोत नाटक हो गया, मै कौन हूं तुमको दिखाता हू, असे म्हणत पोलिस नाईक अनिल लोहारे यांना बेदम मारहाण केली. हा गदारोळ पाहता त्वरित महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या बिट मार्शलला बोलावून आमिर शेखला ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरा त्याच्या विरोधात महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या घटनेने वाहतूक पोलिसांची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची वाहतुक विभागाने गंभीर दखल घेतली असून वाहतूक पोलिसावर हल्ला करणाऱ्याची गय केली जाणार नाही. असा इशारा कल्याण वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी दिला असून जशास तसे उत्तर देवू असे यावेळी स्पष्ट केले आहे. बेशिस्त वाहन चालकाने हल्ला केल्यास वाहतूक पोलिस कर्मचारी आपले स्वरक्षणसाठी बॅटन (लाकडी दांडके) वापर करू शकतो.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Kalyan news traffic police beaten issue