कल्याण: गोदामाची भिंत कोसळून 3 जण जखमी

रविंद्र खरात
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

कल्याण पूर्व मध्ये नागरिक राहतात जनावरे नाही ? 
फोन करून ही पालिका आपातकालीन पथक येत नाही, फायरची गाड़ी आहे मात्र त्यावर दोनच कर्मचारी आहेत, जवळ खासगी हॉस्पिटल आहे मात्र तेथे ही एक तासानंतर डॉक्टर आले, त्या जखमींचा उपचार करेल मात्र या सुविधा कधी मिळणार, कल्याण पूर्व मध्ये माणसे राहतात जनावरे नाही, मोठी दुर्घटना घडल्यावर पालिका प्रशासन जागे होणार क़ाय? असा सवाल स्थानिक नगरसेवक नवीन गवळी यांनी केला असून आगामी महासभेत प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे स्पष्ट केले.

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात मागील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज (गुरुवार) सकाळी पाच ते सव्वा पाचच्या सुमारास कल्याण पूर्व चक्कीनाका परिसरामध्ये शेड आणि भिंत कोसळल्याने ढोल-ताशा पथकातील तिघेजण जखमी झाले आहेत. घटना घडूनही मदत कार्य करण्यासाठी तब्बल अर्धा तासांनंतर पालिका कर्मचारी आल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक नवीन गवळी यांनी केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गणेशोसत्व सुरु असून विसर्जन मिरवणूकीमध्ये ढोल ताशे वाजवून आपले पोट भरण्यासाठी अनेक वाजंत्री कल्याणमध्ये दाखल झाले आहेत.चाळीसगावमधून आलेले आधार शंकर वाघ (55) रोहन आधार वाघ (19) शिवाजी कोळी (50) हे ढोल ताश्या वाजंत्री कल्याण पूर्वमधील चक्कीनाका परिसर मधील बंद असलेल्या गोदामामध्ये साहित्यासह झोपले होते. आज सकाळी सव्वापाचच्या सुमारास मुसळधार पावसाने भिंत आणि शेड कोसळले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक नवीन गवळी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यानी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले. त्यांनी कल्याण पूर्व पालिकेच्या आपात्कालीन पथकाला फोन केले मात्र कोणी आले नाही. शेवटी त्यांनी एका कार्यकर्त्याला पाठविल्याने तब्बल अर्धा तासानंतर पालिका आपात्कालीन पथक आणि अग्निशमन दलाचे पथक येवून तेथे मदत कार्य सुरु केले.

जखमींना जवळच्या मेट्रो खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले असून तेथील पडलेली सरंक्षक भिंत बाजूला करण्याचे काम सुरु झाले असून बाजूला गणेश मंडळाचा मंडप असल्याने पालिकेच्या पथकाला अड़चण येत असल्याचे समजते.

कल्याण पूर्व मध्ये नागरिक राहतात जनावरे नाही ? 
फोन करून ही पालिका आपातकालीन पथक येत नाही, फायरची गाड़ी आहे मात्र त्यावर दोनच कर्मचारी आहेत, जवळ खासगी हॉस्पिटल आहे मात्र तेथे ही एक तासानंतर डॉक्टर आले, त्या जखमींचा उपचार करेल मात्र या सुविधा कधी मिळणार, कल्याण पूर्व मध्ये माणसे राहतात जनावरे नाही, मोठी दुर्घटना घडल्यावर पालिका प्रशासन जागे होणार क़ाय? असा सवाल स्थानिक नगरसेवक नवीन गवळी यांनी केला असून आगामी महासभेत प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Kalyan news wall collapsed 3 injured