कल्याणमध्ये चिमुरडीचा डेंग्यूने मृत्यू, पालकांची चौकशीची मागणी

रविंद्र खरात 
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

कल्याण - कल्याण पूर्व मधील 'साई इंग्लिश हायस्कुल'मधील पहिलीमध्ये शिकणारी सृष्टी अभिजित सोनावणे हीचा डेंग्यूने मृत्यू झाला. या शाळेतील इतर विद्यार्थ्यांना देखील डेंग्यूची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सृष्टी सोनावणे मृत्यू प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी कल्याण पूर्व मधील साई इंग्लिश हायस्कुलच्या प्राथमिक माध्यमिक पालक शिक्षक संघटनेच्या वतीने पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली आहे. 

या शाळेत बालवाडीतील ते इयत्ता दहावीचे 5 हजार 800 विद्यार्थी शिकत असून, सध्या विद्यार्थी तापाने फणफणत आहेत. सृष्टी मृत्युनंतर शाळेच्या परिसरात स्वच्छता करावी, हायस्कुलमध्ये आरोग्य शिबीर राबवावे अशी मागणी पालक शिक्षक संघटना उपाध्यक्ष जितेंद्र गायकवाड, शशिकांत गायकर यांनी पालिकेत आयुक्त समवेत अधिकारी वर्गाची भेट घेत निवेदन देत मागणी केली आहे. याबाबत पालिकेचे पालिका मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू लवांगरे यांची भेट घेतली असता त्यांनी त्या शाळेत आरोग्य शिबिरामार्फत विद्यार्थ्याची आरोग्याची तपासणी करण्याचे आश्वासन दिले. 

आरोग्य विभाग मार्फत उपाययोजना सुरु आहे. या चिमकुलीच्या मृत्यू प्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून, याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश संबधित विभागाला दिले असल्याची माहिती पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली. 

चिमुकल्याचा जीव गेला याबाबत पोलिस आणि पालिकेने न्याय द्यावा यासाठी आज पालिका अधिकारी वर्गाची भेट घेऊन उपाययोजना करण्याची मागणी केली. अन्य विद्यार्थी देखील तापाने ग्रस्त असून, पालिकेने समस्या दूर करावी अशी मागणी साई इंग्लिश हायस्कुल पालक शिक्षक संघटना उपाध्यक्ष जितेंद्र गायकवाड यांनी केली आहे.

कल्याण पूर्व मध्ये नागरिक विद्यार्थी ही तापाने फणफणत असताना डेंग्यू नसल्याचा दावा पालिका करत आहे. खासगी रुग्णालय आणि लॅबचे तपासणी अहवाल खोटे आहेत का? त्यांना पालिका आणि शासन कशी काय परवानगी करते? चुकीच्या पद्धतीने औषध उपचार केल्याने चिमुकीलीच्या जीव गेला आणखी किती जीव पाहिजे असा सवाल पालक शिक्षक संघटनेने केला आहे. 

डेंग्यू आणि साथीच्या आजाराच्या रुग्णाची संख्या वाढ ...
1 जून ते 12 ऑक्टोबर 2018 या कालावधीत रुग्णाची संख्या ...
गेस्ट्रो 240, कावीळ 221, टायफाईड 541, संशयित डेंग्यू 960 यात मृत्यू 1, संशयित लेप्टो 11 यात 4 जणांचा मृत्यू, मलेरिया 200, तापरुग्ण 23 हजार 492, स्वाइन प्लु 16 यात 1 रुगणाचा मृत्यू झाला आहे. आकडेवारी पाहता रुग्ण वाढत असून शासनाने यात लक्ष्य घालून उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मागणी होत आहे.

Web Title: In Kalyan one dead by dengue, parents demand inquiry