कल्याण रेल्वे स्थानकाचा लूक बदलणार - डी. के. शर्मा

रविंद्र खरात 
शनिवार, 24 मार्च 2018

कल्याण : मध्य रेल्वेत कल्याण रेल्वे स्थानक महत्वाचे स्थानक आहे. रेल्वे स्थानक मध्ये येताना जाताना क्रॉसिंग रेल्वे मार्ग असल्याने वेळ वाया जातो त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाचे रिमॉडलिंग करण्यासाठी या रेल्वे अर्थसंकल्पात सुमारे 960 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाचे लूक बदलणार असून या कामामुळे लोकलच्या प्रवाशांना निश्चित दिलासा मिळेल अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी सकाळला दिली. 

कल्याण : मध्य रेल्वेत कल्याण रेल्वे स्थानक महत्वाचे स्थानक आहे. रेल्वे स्थानक मध्ये येताना जाताना क्रॉसिंग रेल्वे मार्ग असल्याने वेळ वाया जातो त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाचे रिमॉडलिंग करण्यासाठी या रेल्वे अर्थसंकल्पात सुमारे 960 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाचे लूक बदलणार असून या कामामुळे लोकलच्या प्रवाशांना निश्चित दिलासा मिळेल अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी सकाळला दिली. 

डोंबिवली मधील सामाजिक कार्यकर्त्या ज्योती अय्यर यांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक वर महिला शौचालय मध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेडिंग मशीन बसविण्यात आले असून त्याचे उद्घाटन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, यावेळी विभागीय व्यवस्थापक संजय जैन, सुरक्षा बलाचे आयुक्त सचिन भलोदे, आमदार नरेंद्र पवार, ज्योती अय्यर, कल्याण स्टेशन डायरेक्टर विरेश्वर सिंग, स्टेशन मास्तर प्रदीप कुमार दास, कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष राजेश घनघाव यांच्या समवेत मध्य रेल्वेचे विविध विभागाचे अधिकारी, सुरक्षा बलाचे अधिकारी, रेल्वे पोलीस अधिकारी, प्रवासी संघटना, महिला सामाजिक संघटना पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

यावेळी विविध मुद्यावर बोलताना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा म्हणाले की, मुंबई मधील केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल असल्याने त्यांना रेल्वेच्या अनेक समस्या माहित असून सुमारे 55 हजार कोटी रुपयांचे विविध कामे हाती घेण्यात येणार असून यासोबत यासोबत मेट्रो, मोनो रेल्वे अनेक शहरात येत असल्याने आगामी तीन न ते पाच वर्षात निश्चित मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्याचा लाभ होईल असे सांगत, महिलांच्या लोकल गाड्या वाढविण्याचा प्रयत्न सुरू असून सध्या लोकल आणि मेल गाड्यांमध्ये महिला डब्बे वाढविले असून भविष्यात विशेष महिला लोकल सोडल्या जातील तर महिलासाठी विविध उपक्रम हाती घेतले असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

कल्याण रेल्वे स्थानक हे महत्वाचे असून लोकल आणि मेल गाड्या येथून येतात आणि जातात, फलाट संख्या कमी असून त्यात येताना आणि जाताना क्रॉसिंग मध्ये वेळ वाया जातो यासाठी आता लवकरच कल्याण रेल्वे स्थानकाचे लूक बदलण्यात येईल या रेल्वे अर्थ संकल्प मध्ये सुमारे 960 कोटी रुपयांची तरतूद केली असून यात कल्याण रेल्वे स्थानकाचे रिमोडलिंग केले जाईल  मेल आणि लोकल गाड्या एकाच रुळावरून धावतील त्या क्रॉस होणार नाही तर कर्जत आणि कसारा जाणाऱ्या लोकल सरळ जातील आणि येतील.

मुंबईचे रेल्वे मंत्री असल्याने त्यांना मुंबई मधील समस्या माहीत असून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून त्यावर काम सुरू असल्याचे सांगत रेल्वे असो खासगी संस्थेत जेथे महिला काम करत आहेत , त्या रेल्वे लोकल ने प्रतिदिन प्रवास करत आहेत त्यांच्यासाठी वेगळी मागणी करण्याची गरज नसून मध्य रेल्वे विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे .परेल येथे कोचिंग टर्मिनसचे काम हाती घेण्यात येणार आहे. 

कल्याण कसारा तिसऱ्या मार्गाचे काम सुरू असून कल्याण ते टिटवाळा चौथ्या मार्गचे काम सुरू होईल तर कल्याण कर्जत चार मार्ग करायचे असून कल्याण ते बदलापूर तिसऱ्या मार्गाचे काम हाती घेणार असल्याची माहिती यावेळी दिली .यामुळे लोकल प्रवास झटपट यासाठी रेल्वे प्रशासन दिवसरात्र मेहनत करत असून तीन ते पाच वर्षात प्रवाश्याना याचा लाभ घेता येईल असे यावेळी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी के शर्मा यांनी स्पष्ट केले. 

मध्य रेल्वेच्या कल्याण मधील शाळेच्या विद्यार्थी वर्गाने कल्याण रेल्वे स्थानकात रंग रंगोटी केली असून स्वच्छतेचा संदेश दिला. या बच्चे कंपनीचे कौतुक महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी केले तर यावेळी कल्याण रेल्वे स्टेशनची पाहणी करत तिकीट घरातील अधिकारी कर्मचारी वर्गाशी चर्चा करत स्टेशन मास्तर आणि डायरेक्टर यांना काही सूचना ही यावेळी दिल्या, यावेळी कल्याण रेल्वे स्थानक रिमोडलिंग कसे होणार याचा आराखडा ही पाहत अधिकारी वर्गाला काही आदेश दिले.
 

Web Title: kalyan railwat station will changes the look in some days said by d k sharma