कल्याण रेल्वे पोलिस ठाणे धोकादायक अवस्थेत

रविंद्र खरात 
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

मध्य रेल्वेमार्गावरील महत्वाच्या रेल्वे स्थानक मानणाऱ्या कल्याण ते कसारा आणि कल्याण ते बदलापुर रेल्वे स्थानकादरम्यानची सुरक्षा सांभाळणाऱ्या कल्याण रेल्वे पोलिसांचा जीव गेली तीन वर्ष कमालीच्या धोक्यात आहे, पोलिस ठाण्याची इमारत धोकादायक झाली असून ती त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे .

कल्याण: मध्य रेल्वेमार्गावरील महत्वाच्या रेल्वे स्थानक मानणाऱ्या कल्याण ते कसारा आणि कल्याण ते बदलापुर रेल्वे स्थानकादरम्यानची सुरक्षा सांभाळणाऱ्या कल्याण रेल्वे पोलिसांचा जीव गेली तीन वर्ष कमालीच्या धोक्यात आहे, पोलिस ठाण्याची इमारत धोकादायक झाली असून ती त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे .

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात 75 वर्ष जुने रेल्वे पोलिस ठाण्याची इमारत आहेत . या इमारत मध्ये 209 अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत . कल्याण रेल्वे स्थानक महत्वाचे स्थानक असल्याने प्रवासी वर्गाची 24 तास वर्दळ असते , मोबाईल हरविला , नातेवाईक हरविला , अपघात झाला आदी तक्रारी घेवून नागरिक नेहमीच या पोलिस ठाण्यात येत असतात , दरम्यान कल्याण ते कसारा आणि कल्याण ते बदलापुर या रेल्वे स्थानका दरम्यान सुरक्षा सांभाळणाऱ्या कल्याण रेल्वे पोलिसांचा जीव गेली तीन वर्ष धोक्यात आला आहे,

पोलिस ठाण्याच्या भिंतीना तड़े पडले असून कौलारु असलेल्या छप्पर धोकादायक झाले असून अनेक ठिकाणी गळकीमुळे भर पावसात आपला जीव मुठीत ठेवून काम करावे लागते. अनेक वेळा पावसाचे पाणी पोलिस ठाण्यात पाणी साचु नये म्हणून तेथे मोटर लावण्यात आली आहे. पोलिस सुरक्षित नसतील तर प्रवासी वर्गाची कशी सुरक्षा करणार असा सवाल कल्याण कसारा कर्जत रेल्वे  प्रवासी संघटनाने केला आहे.

पोलिस ठाण्यात दलदल , मुद्देमाल खोली मध्ये छप्पर तुटला असून अनेक ठिकाणी भिंतीना तड़े गेले असून जुनाट इमारत मुळे रेल्वे पोलिस अधिकारी कर्मचारी वर्गाचे आरोग्य धोक्यात आले आहे .यासोबत कल्याण पूर्व मध्ये रेल्वे स्थानकाच्या बाजूला कल्याण विभाग मधील रेल्वेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालय असून ते ही मोड़कळीस आले आहे , याबाबत स्थानिक रेल्वे पोलिस ठाण्यामधून वरिष्ठ अधिकारी वर्गाला मागील 2 वर्षापासून पाठपुरावा सुरु असून रेल्वे पोलिस आयुक्तांनी 23 जानेवारी 2017 रोजी कल्याण रेल्वे स्थानकाची दुरावस्था बाबत रेल्वे प्रशासनाचे लक्ष्य वेधले असून दुरुस्ती करण्याचे पत्र दिले होते त्यावेळी दुरुस्ती साठी 23 लाखाची मात्र रेल्वे प्रशासन कडून कुठलीही कारवाई झाली नसल्याने स्थानिक पोलिस कर्मचारी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे .दरम्यान कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचीव श्याम उबाळे आणि अन्य पदाधिकारी वर्गाने कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात जावून अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या आणि धोकादायक पोलिस ठाण्याची पाहणी यावेळी केली . असुरक्षित रेल्वे पोलिस असतील तर ते प्रवासी वर्गाला सेवा क़ाय देणार असा सवाल रेल्वे प्रवासी संघटनाने केला आहे.

कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याची इमारत धोकादायक झाली आहे , दुरुस्ती साठी स्थानिक पोलिस अधिकारी मागील 2 वर्ष पाठपुरावा करत आहे , दुरुस्तीसाठी 23 लाखाची निधीही तरतूद केल्याचे समजते मात्र उपाय योजना नाही म्हणून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे याबाबत तक्रार केल्याची माहिती कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी सकाळला दिली .

Web Title: Kalyan railway police station is in bad condition esakal news