स्वच्छ भारत मोहिमे अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानक स्वच्छता मोहीम

रविंद्र खरात 
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

कल्याण : महात्मा गांधीच्या 150 व्या जयंती निमित्त रेल्वेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2018 या स्वच्छता हीच सेवा - पंधरवडा अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानकात आज शनिवार ता 22सप्टेंबर रोजी कल्याण मधील बिर्ला कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. तर रेल्वेच्या मुंबई विभागीय सीआरच्या सांस्कृतिक अकादमीने स्वच्छतेवर प्रवाश्यांना पथनाट्य मार्फत प्रबोधन करण्यात आले. 

देशात सर्वात अस्वच्छ रेल्वे स्थानकाच्या यादीत कल्याण रेल्वे स्थानकाचे नाव आल्यानंतर सर्व स्तरातुन टिका झाल्यावर कल्याण रेल्वे स्थानक स्वच्छ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली असून स्वच्छ रेल्वे स्थानकाचा यादी मध्ये पहिल्या 20 च्या आत कल्याण रेल्वे स्थानकाचे नाव येण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

महात्मा गांधीच्या 150 व्या जयंती निमित्त रेल्वेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2018 या स्वच्छता हीच सेवा - पंधरवडा देशभरात साजरी करण्यात येत असून. मध्य रेल्वेच्या स्वच्छ रेल स्वच्छ भारत या मोहिमेअंतर्गत कल्याण रेल्वे स्थानकात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 

आज शनिवार ता 22 सप्टेंबर सेवा दिना अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानकात विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते . कल्याण मधील बिर्ला कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला ,तर रेल्वेच्या मुंबई विभागीय सीआरच्या सांस्कृतिक अकादमीने  स्वच्छतेवर प्रवाश्यांना पथनाट्य मार्फत प्रबोधन करण्यात आले . यावेळी बिर्ला कॉलेज शिक्षक वर्ग, स्टेशन मास्तर प्रदीपकुमार दास, स्टेशन डायरेक्टर यशवंत व्हटकर सहित कल्याण रेल्वे स्थानक मधील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला . 
 
Web Title: Kalyan railway station cleanliness campaign under clean India campaign