कल्याणच्या शिल्पकाराचे शिल्प इंग्लंडमध्ये

कल्याणच्या शिल्पकाराचे शिल्प इंग्लंडमध्ये


कल्याण : पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात वीरमरण आलेल्या शीख सैनिकांची आठवण म्हणून इंग्लंडमधील यॉर्कशायरमध्ये एक स्मारक उभारण्यात आले आहे. शत्रूसमोर आव्हान पेलायला उभा ठाकलेला शीख सैनिक या स्मारकात उभा करण्यात आला आहे. कल्याणचे शिल्पकार जयदीप आपटे यांनी सैनिकाचे हे शिल्प साकारले आहे. सुप्रसिद्ध शिल्पकार सदाशिव तथा भाऊ साठे यांची परंपरा चालवणाऱ्या या युवा शिल्पकाराचे कल्याणात कौतुक होत आहे.

३३० किलो वजनाचे हे शिल्प ब्रांझ धातूमध्ये बनवण्यात आले आहे. साधारण आठ महिन्यांच्या कालावधीत जयदीप यांनी हे शिल्प तयार केले. यॉर्कशायर परिसरात शीख सोल्जर्स संघटनेच्या माध्यमातून वीरगती प्राप्त झालेल्या शीख सैनिकांचे स्मारक उभे करण्यात आले आहे. ३० नोव्हेंबर रोजी स्मारकात या सैनिकाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. युद्धासाठी सज्ज झालेला सैनिक जयदीप यांनी साकारला आहे.

गुजरातमधील दांडी मेमोरियलमध्येही जयदीप यांनी तयार केलेली दोन शिल्पे समाविष्ट करण्यात आली आहेत. कणकवली येथेही अप्पासाहेब पटवर्धन यांचे शिल्प जयदीप यांनी उभे केले आहे. कल्याणातील खडकपाडा चौकात सुशोभीकरणासाठी उभ्या करण्यात आलेल्या सिंहाचे शिल्पही जयदीप यांनी साकारले आहे. 

२०१४ मध्ये संघटनेने मला पहिल्यांदा संपर्क केला होता. मी ज्या जे जे कला महाविद्यालयात शिक्षण घेतले तेथूनच त्यांना माझ्याबद्दलची माहिती मिळाली होती. २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात काही पदाधिकारी कल्याणात येऊन माझी प्रत्यक्ष भेट घेऊन गेले. सरकारी परवानग्या मिळाल्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी काम निश्‍चित केले. 
 जयदीप आपटे, शिल्पकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com