कल्याण - डंपिंग ग्राउंड बंद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आयुक्तांचे आश्वासन

सुचिता करमरकर
बुधवार, 21 मार्च 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे सुरु असलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीची पाहणी करुन आधारवाडी डंपिंग ग्राउंड बंद करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर प्रयत्न करण्याचे आश्वासन पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी आज स्थानिक नागरिकांना दिले. आयुक्त बोडके यांनी आज डंपिंग ग्राउंडची पाहणी केली. या वेळी त्यांच्या समवेत पालिका अधिकारी तसेच स्थानिक नागरिक होते. 

डंपिंग ग्राउंडवरील आगीच्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी सोमवारी (19 मार्च ) मोर्चा काढून आयुक्तांची भेट घेतली होती. त्यावेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आयुक्तांनी आज पाहणी करुन तेथील प्रश्न जाणून घेतले. मागील अनेक वर्षांपासून हे डंपिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी रहिवासी करत आहेत, मात्र पालिका प्रशासन त्यावर योग्य उपाय करण्यात अपयशी ठरत आहे, अशी तक्रार रहिवाशांनी केली. आज या पाहणी दौऱ्यात महिलांची संख्या अधिक होती. हवामानात कोणताही बदल झाला तरी कचऱ्यापासून तसेच त्याच्या दुर्गंधीपासून आमची सुटका नाही. आपण आता पदभार स्विकारला आहात, या समस्येकडे प्राधान्याने  लक्ष द्या अशी विनंती या महिलांनी केली.

ग्राउंडलगत असलेल्या साठेनगर वसाहतीतील अवंतिका खंडागळे यांनीही तेथील रहिवाशांच्या अडचणी सांगितल्या. डंपिंग ग्राउंडच्या आतील भागात असलेल्या वस्तीला न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी केली. येथे दोनशे कुटूंब राहतात. त्यातील काहींना पालिकेने घरे दिली आहेत परंतु त्या घरांची पाहणी केल्यावर त्यांच्या समस्या आपल्याला समजतील असेही खंडागळे यांनी सांगितले. 

नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आयुक्तांनी या विषयात प्राधान्याने लक्ष घालण्याचे मान्य केले. पालिका या संदर्भात करत असलेली कामे, त्यांची स्थिती याची पाहणी करुन आपण हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन त्यांनी दिले. शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त धनाजी तोरसकर, केली प्रभाग क्षेत्र अधिकारी विनय कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.  

Web Title: kalyan trying for closing down of dumping group