कामत गटातील उमेदवार वेटिंगवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

मुंबई -कॉंग्रेसने 115 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, त्यात कामत गटातील उमेदवरांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. कामत गटातील विद्यमान नगरसेवकांसह किमान 30 इच्छुकांच्या प्रभागातील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही, तर अनेकांचे तिकीट कापण्यात आले आहे; मात्र इतर गटांमधील इच्छुकांना न्याय देण्याचा प्रयत्न पहिल्या यादीत करण्यात आला आहे. 

पालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून माजी खासदार गुरुदास कामत आणि मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यातील वाद उफाळून आला होता. त्यासाठी पक्षश्रेष्ठींनी केंद्रीय निरीक्षक नेमला होता. या वादानंतर कामत यांनी निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेकडे पाठ फिरवली होती. त्याचा फटका कामत गटाला बसला आहे. कामत गटातील विद्यमान नगरसेवकांसह किमान 30 इच्छुकांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर किमान 15 इच्छुकांचे तिकीट कापण्यात आले आहे. कामत गटाचा पत्ता कट करताना पहिल्या यादीत कॉंग्रेसमधील इतर गटांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

वारसांना उमेदवारी 
आरक्षणामुळे फटका बसलेल्या काही नगरसेवक आणि नगरसेविकांच्या वारसांना उमेदवारी देण्यात आली आहे. नगरसेविका अजंता यादव यांचे पती राजपती यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर नायगाव येथील नगरसेवक सुनील मोरे यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. माजी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांच्या वारसालाही उमेदवारी देण्यात आली आहे. 

Web Title: Kamat group of candidates on the waiting