दिंडोशी दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाला कंगनाचं आव्हान, दाखल करणार याचिका

दिंडोशी दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाला कंगनाचं आव्हान, दाखल करणार याचिका

मुंबईः  खारमधील अनधिकृतपणे काम केलेल्या फ्लॅटसंबंधित दिंडोशी दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाला अभिनेत्री कंगना राणावत लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान देणार आहे. 

ऑर्किड ब्रीझ या टॉवरमध्ये कंगनाचे तीन फ्लॅट आहेत. या फ्लॅटमध्ये तिने अनधिकृत बांधकाम केले आहे, अशी नोटीस मुंबई महापालिकेने बजावली होती. तसेच संबंधित बांधकामावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. याविरोधात तिने दिंडोशी न्यायालयात दिवाणी दावा केला होता. यावर बुधवारी न्यायालयाने निकाल जाहीर केला आणि महापालिकेची नोटीस वैध ठरविली. या निर्णयाविरोधात कंगना उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती तिचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी ट्विटद्वारे दिली आहे. 

दिंडोशी न्यायालयाने कंगनाचा दावा नामंजूर केला आहे. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात याचिका करणार आहोत, असे त्यांनी ट्विटरवर जाहीर केले आहे. न्यायालयाने कंगनाला उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी सहा आठवड्यांचा अवधी मंजूर केला आहे. 

काही दिवसांपूर्वी पाली हिल येथील तिच्या कार्यालयातील कथित अवैध बांधकाम कारवाई विरोधात तिने उच्च न्यायालयात याचिका केली होती. यामध्ये न्यायालयाने नियमानुसार कारवाई केली नाही म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते.

दिंडोशी न्यायालयाच्या निर्णयाबाबत मुंबई महापालिका उच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल करणार आहे. त्यामुळे कंगणाच्या वतीने याचिका दाखल केल्यास महापालिकेची बाजू ऐकून घेतल्याशिवाय न्यायालय निकाल देणार नाही. 

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Kangana Ranaut Dindoshi civil court plea Orchid Breeze Building khar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com