दसऱ्याचा मुहूर्त साधत कंगनाने पुन्हा संजय राऊतांना डिवचलं

सुमित बागुल
Sunday, 25 October 2020

कंगना रनौत विरुद्ध शिवसेना आणि संजय राऊत यांच्यातील वाद काही नवीन राहिलेला नाही

मुंबई : कंगना रनौत विरुद्ध शिवसेना आणि संजय राऊत यांच्यातील वाद काही नवीन राहिलेला नाही. अशात दसऱ्याच्या दिवशीही कंगना रनौतने शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करायची संधी सोडलेली नाही.

आज दसऱ्याचा मुहूर्त साधत शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर अभिनेत्री कंगना रनौतने निशाणा साधलाय. बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंगना रनौतच्या कार्यालयाच्या बेकायदा बांधकामावर बुल्डोजर चालवत कारवाई केली होती. आज कंगनाने त्याच बंगल्याचा फोटो ट्विट करत करत शिवसेनेवर टीका केलीये 

महत्त्वाची बातमी : आज मुख्यमंत्री मास्क काढून बोलतील: संजय राऊत

कंगना ट्विटमधून म्हणतेय : 

"माझं तुटलेलं स्वप्न तुझ्याकडे पाहून आज हसतंय.संजय राऊत , पप्पू सेने माझं घर तोडू शकतात पण माझं मनोधैर्य तोडू शकत नाहीत. बंगला क्रमांक 5 क्रमांक आज वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करीत आहे. शुभ दसरा !"

kangana ranaut once again targets shivsena MP sanjay raut in her twteet for Dussehra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana ranaut once again targets shivsena MP sanjay raut in her twteet for Dussehra