आदित्य ठाकरेंचं उठणं-बसणं मुव्ही माफिया आणि सुशांतच्या खुन्यांसोबत, कंगनाने पहिल्यांदाच थेट नाव घेत केलं ट्विट

सुमित बागुल
Monday, 14 September 2020

खरंतर अनेक दिवसांपासून विरोधकांकडून आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात येत होता. कुणी तरुण मंत्री म्हणत निशाणा साधला होतं, तर कुणी बॉलिवूडचा मंत्री म्हणून निशाणा साधत होतं

मुंबई : कंगना आज मुंबईहून हिमाचलला परतली. मुंबईहून जाताना कंगनाने मुंबईचा पुन्हा एकदा POK म्हणून उल्लेख केला. यानंतर आता हिमाचलमध्ये पोहोचल्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेला टार्गेट केलंय. कंगनाने नव्याने केलेल्या ट्विटमध्ये तिने थेट उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. आदित्य ठाकरे यांच्या संबंधित लोकांना उघडं पडल्याने उद्धव ठाकरे आपल्याविरुद्ध कारवाई करत असल्याचं कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. या ट्विटनंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि कंगना वादाचा नवा अंक आपल्याला पाहायला मिळतोय.

मोठी बातमी - सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी FIR का दाखल केला नाही? अनिल देशमुखांनी केला 'मोठा' खुलासा

आज पहिल्यांदाच कंगनाने थेट आदित्य ठाकरेंचं नाव घेत शिवसेनेवर निशाणा साधलाय. यामध्ये कंगना म्हणतेय की, "मी मुव्ही माफिया, सुशांतचे मारेकरी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करेन हीच गोष्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना झोंबली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे ज्यांच्यासोबत फिरतात त्यांचा मी पर्दाफाश करणं हाच माझा गुन्हा" असल्याचं कंगना आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. म्हणूनच आता त्यांना माझा बंदोबस्त लावायचा आहे. ओके, ट्राय करा, पाहुयात कोण कुणाचा बंदोबस्त लावतंय. कंगनाने एक ट्विट शेअर केलंय. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने या ओळी लिहिल्या आहेत. 

खरंतर अनेक दिवसांपासून विरोधकांकडून आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात येत होता. कुणी तरुण मंत्री म्हणत निशाणा साधला होतं, तर कुणी बॉलिवूडचा मंत्री म्हणून निशाणा साधत होतं. मात्र कंगनाने आज थेट आदित्य ठाकरे यांची लिंक मुव्ही माफिया, सुशांतचे खुनी आणि ड्रग्स रॅकेटशी लावत त्यांच्यावर थेट निशाणा साधलाय.  

मोठी बातमी - तंत्रज्ञानाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा, हत्या करून नजीकच्या जंगलात पुरला होता मृतदेह

दरम्यान, याआधी कंगनाने शिवसेनेला सोनिया सेना म्हणत एक आणखीन एक ट्विट केलेलं. 

दरम्यान, कंगनाच्या ट्विटनंतर शिवसेना विरुद्ध कंगना हा वाद लवकर संपेल अशी चिन्ह दिसत नाहीत.  

kangana ranaut one more tweet targeting aaditya thackeray and maharashtra CM


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana ranaut one more tweet targeting aaditya thackeray and maharashtra CM