कंगना रानौतचं मुंबईत परतली; ठाकरे सरकाला पुन्हा डिवचले

तुषार सोनवणे
Tuesday, 29 December 2020

कंगना रानौत मुंबईत पोहचल्यानंतर कंगनाने सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेतले. तिच्यासोबत बहिण रंगोली आणि भाऊ वहिनी सुद्धा होती.  यावेळी कंगनाने नाव न घेता ठाकरे सरकारला डिवचले आहे

मुंबई - अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात काही दिवसांपूर्वी चांगलाच ट्विटवॉर रंगला होता. त्यांच्यातील वाद मुंबई उच्च न्यायालयातसुद्धा पोहचला आहे. बऱ्याच दिवसांनी कंगना पुन्हा एकदा मुंबईत आली आहे. मुंबईत पोहचल्यानंतर कंगनाने सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेतले. तिच्यासोबत बहिण रंगोली आणि भाऊ वहिनी सुद्धा होती.  यावेळी कंगनाने नाव न घेता ठाकरे सरकारला डिवचले आहे

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

सिद्धिविनायक मंदिराबाहेर येताच  'जय महाराष्ट्र' असे,  कंगनाने म्हटले. त्याठिकाणी असलेल्या प्रसारमाध्यमांशी बोलतानांना कंगना म्हणाली की, 'मला मुंबईत राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. फक्त गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि परवानगी हवी आहे. ती मिळाली आहे. आणखी कोणाकडेही परवानगीची गरज नाही.' मंदिराबाहेरील फोटो कंगनाने ट्विटरवही शेअर केले आहे. त्यात ती म्हटली की,  ' माझ्या लाडक्या मुंबई शहरासाठी उभं राहिल्यानंतर शत्रुत्वाचं प्रमाण आश्चर्यचकित करणारं होतं  आज मी मुंबादेवी आणि सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. मला सुरक्षित  आणि स्वागत केल्यासारखं वाटत आहे.'

हेही वाचा - छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि छावा संघटनेने केलीय.

ठाकरे सरकार, खासदार संजय राऊत आणि कंगना रानौतमध्ये मोठा वाद पाहायला मिळाला होता. त्यानंतर कंगना हिमाचलमध्ये आपल्या कुटूंबात सुट्टी घालवत होती. नुकतीच कंगना रानौत मुंबईत दाखल झाली आहे. त्यावेळी तीला कडक सुरक्षाव्यवस्थाही देण्यात आली होती. ठाकरे सरकार सोबत झालेल्या वादानंतर तीला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. 

Kangana Ranaut returns to Mumbai at siddhivinayak temple

----------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranaut returns to Mumbai at siddhivinayak temple