कमेंट केली आणि मानले Facebookचे आभार; कंगनाकडून मोठी चूक, होतेय ट्रोल

पूजा विचारे
Tuesday, 15 September 2020

कंगना सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतेय. पोस्टचा अर्थच लक्षात न घेता कंगनानं त्यावर कमेंट केली आणि फेसबुकचे आभार मानलेत. सोनिया सेनेच्या गुंडांपासून स्वतःचा बचाव करण्यावर केलेल्या पोस्टमुळे कंगना आता ट्रोल होतेय. नेमकं काय झालं जाणून घेऊया

मुंबईः अभिनेत्री कंगना राणावत सध्या बरीच ट्रेडिंगमध्ये आहे. सोशल मीडियावर तिच्याच नावाची चर्चा आहे. कंगनाचं अजूनही शिवसेनेसोबत ट्विटरवर वॉर सुरुच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना सोशल मीडियावरुन शिवसेनेवर टीका करत आहे. मात्र आता कंगना सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतेय. पोस्टचा अर्थच लक्षात न घेता कंगनानं त्यावर कमेंट केली आणि फेसबुकचे आभार मानलेत. सोनिया सेनेच्या गुंडांपासून स्वतःचा बचाव करण्यावर केलेल्या पोस्टमुळे कंगना आता ट्रोल होतेय. नेमकं काय झालं जाणून घेऊया

Thefauxy.com या उपहासात्मक लिखाण आणि विडंबन करणाऱ्या वेबसाईटनं सोनिया सेनेच्या गुंडांपासून सेफ असल्याचं फीचर फेसबुकने दिल्याची बातमी दिली. त्यात फेसबुकनं सोनिया सेनेच्या गुंडांपासून आपण सुरक्षित असल्याचं मार्क करा, असं नवं फिचर आणलं असल्याची बातमी प्रसिद्द झाली. खरंतरं फेसबुक हे दरवेळीस संकटकाळात अशा प्रकराचं फिचर लॉन्च करत असतं. उदाहरणार्थ, निसर्ग चक्रीवादळात मी सुरक्षित आहे, असं लिहिण्याची सोय फेसबुकनं ठेवली होती. या फिचरमध्ये तुम्ही सेफ असल्याचा मॅसेज तुमच्या कुटुंबियांना मिळत असतो. 

Thefauxy.comनं ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर कंगनानं त्यावर ट्विट केलं आणि फेसबुकला धन्यवाद म्हटलं. त्यावर टाळ्यांचा इमोजी शेअर करत कंगनानं लिहिलं की,  लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण झालंच पाहिजे. सोनिया सेनेच्या गुंडांपासून लोकांना कोविड- १९ व्हायरस सारखंचं संरक्षण हवं आहे. या फिचरचा समावेश केल्याबद्दल आभारी आहे.

निषेध करण्यासाठी कंगनानं हे ट्विट केलं. पण त्याला अर्थ तिला समजलाच नाही. कंगनानं हे ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. . कंगनाच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी मात्र कंगनाने मुद्दामच हे ट्वीट केलं. कंगनाच्या ट्वीटमध्येही उपहास दडला आहे, असं सांगत बाजू लावून धरली आहे. मात्र आता कंगनानं हे ट्विट अनवधानानं केलं की तिला ही बातमी खरी वाटली आणि तिनं फेसबुकचे आभार मानले, याबद्दल काही सांगता येत नाही आहे. पण दुसरीकडे नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

kangana ranaut trolls social media satirical content sonia sena facebook feature


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana ranaut trolls social media satirical content sonia sena facebook feature