कंगना मुंबई पालिकेला म्हणते बाबर; अभिनेत्रीकडून पुन्हा एकदा पाकिस्तानचा उल्लेख 

पूजा विचारे
Wednesday, 9 September 2020

पालिकेच्या कारवाई विरोधात कंगनानं ट्विटरवर ट्विटची मालिका सुरुच ठेवली आहे. यावेळी तिनं बरेच ट्विट केलेत. यावेळी तिनं आपल्या ऑफिसलला राम मंदिराची उपमा दिली. तर बीएमसीची तुलना बाबराशी केली असून अभिनेत्रीनं पुन्हा एकदा पाकिस्तानचा उल्लेख केला आहे. 

मुंबईः अभिनेत्री कंगना राणावत कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाईला केली आहे. मुंबई  महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयाच्या तळमजल्यावर कारवाई  केली. दरम्यान दीड तास कारवाई केल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी  तूर्तास ही कारवाई थांबवली आहे. अभिनेत्रीच्या कारवाई करणारे पालिकेच्या अधिकारी कार्यालयाबाहेर पडले आहेत. पाली हिलमधील कार्यालयाबाहेर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

पालिकेच्या कारवाई विरोधात कंगनानं ट्विटरवर ट्विटची मालिका सुरुच ठेवली आहे. यावेळी तिनं बरेच ट्विट केलेत. यावेळी तिनं आपल्या ऑफिसलला राम मंदिराची उपमा दिली. तर बीएमसीची तुलना बाबराशी केली असून अभिनेत्रीनं पुन्हा एकदा पाकिस्तानचा उल्लेख केला आहे. 

 

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी कंगनाच्या कार्यालयाचं अनधिकृत म्हणत नोटीस बजावली होती. त्यानंतर कंगनाकडून पालिकेला दिलेली उत्तरे आणि कारणे समाधानकारक नसल्याचं पालिकेनं म्हटलं आणि पाली हिल परिसरात असलेल्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली. पालिकेनं ११ च्या सुमारास टाळे तोडून तिच्या कार्यालयात प्रवेश केली आणि पोलिसांच्या बंदोबस्तात तळमजल्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. 

 

यावेळी कंगनानं तीन ट्विट केलं. पहिल्या ट्विटमध्ये तिनं आपल्या कार्यालयाला राम मंदिराची उपमा दिली. त्या ट्विटमध्ये तिनं लिहिलं की, मणिकर्णिका फिल्म्स'मध्ये 'अयोध्या'ची घोषणा केली होती. ही माझ्यासाठी एक इमारत नाही तर राम मंदिरच आहे, आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होईल, राम मंदिर पुन्हा पडणार. पण लक्षात ठेव बाबर हे मंदिर पुन्हा बनणार, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम.

आणखी एका ट्विटमध्ये कंगनानं पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांचा फोटो शेअर केला. या फोटोवर तिनं बाबर आणि त्याचे सैन्य असं कॅप्शन दिलं आहे. यात तिनं #deathofdemocracy हा हॅशटॅगही वापरला आहे. 

तिसऱ्या ट्विटमध्येही तिनं पाकिस्तान असं लिहिलं लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केली. याआधी कंगनानं  मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यानंतर आता महापालिकेच्या कारवाईनंतर तिनं थेट मुंबईला पाकिस्तान असं संबोधलं आहे. 

Kangana Ranaut tweet for bmc officials babar and pakistan


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranaut tweet for bmc officials babar and pakistan