कंगनाकडून पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा, शेअर केला बाळासाहेबांचा 'तो' व्हिडिओ

पूजा विचारे | Friday, 11 September 2020

कंगना राणावतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. सध्या शिवसेना आणि कंगना असा वाद पेटला आहे. आज कंगनानं आणखी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तिनं दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे.

मुंबईः अभिनेत्री कंगना राणावतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. सध्या शिवसेना आणि कंगना असा वाद पेटला आहे. आज कंगनानं आणखी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तिनं दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आघाडी करुन शिवसेनेची एक दिवस काँग्रेस होईल असं म्हटल्याचा व्हिडिओ आहे.  कंगनानं ट्विटमध्ये आज शिवसेनेची परिस्थिती पाहून काय वाटत असेल असा सवालही उपस्थित केला आहे.  कंगनानं याआधी शिवसेनेविरोधात अनेक ट्विटही केलेत.

गुरुवारी सकाळीही कंगनानं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा विकून शिवसेनेची सोनिया सेना झाली आहे, अशा आशयाचं ट्विट केलं होतं. बुधवारी संध्याकाळी मुंबईत परतल्यानंतर कंगनानं मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. 

 

श्री बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारसरणीवर शिवसेना निर्माण केली, आज तीच विचारधारा सत्तेसाठी विकली आणि शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली. ज्या गुंडांनी माझे घर माझ्या मागे फोडले, त्यांना नागरी संस्था म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका, असे ट्वीट कंगनाने केलं.

बुधवारी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. 

Kangana targeted Shiv Sena shared Balasaheb video