esakal | जावेद अख्तर यांनी केलेल्या खटल्याची कारवाई कायम - हायकोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

kangana ranaut-javed akhtar

जावेद अख्तर यांनी केलेल्या खटल्याची कारवाई कायम - हायकोर्ट

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या (kangana ranaut) विरोधात दंडाधिकारी न्यायालयाने (court) सुरू केलेली मानहानीच्या खटल्याची (Defamation case) कारवाई योग्य आहे असा निकाल आज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) दिला. यामुळे कंगनाला आता खटल्याच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.

हेही वाचा: सकाळ ॲग्रोवनच्या ‘सुगरण’ स्पर्धेचा मुंबईच्या महापौरांनी केला शुभारंभ

कंगनाच्या विरोधात अख्तर यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. यामध्ये न्यायालयाने खटल्याची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई रद्दबातल करण्यासाठी कंगनाने उच्च न्यायालयात याचिका केली असून न्यायालयाने नियमबाह्य पध्दतीने कारवाई केली, असा आरोप याचिकेत केला आहे. न्या रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली होती. न्या डेरे यांनी आज यावर निकाल जाहीर केला. कंगनाला न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नसून याचिका नामंजूर केली. यासंबंधी सविस्तर निकालपत्र लवकरच उपलब्ध होईल.

अख्तर यांच्या वतीने एड जे भारद्वाज यांनी बाजू मांडली.. दंडाधिकारी न्यायालयाने केलेली कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसारच केली आहे. अब्रुनुकसानीच्या फौजदारी दाव्यात आवश्यक असलेल्या तरतुदींचे पालन करण्यात आले आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. पोलिसांनी समन्स बजावूनही कंगना पोलीस चौकशी ला देखील हजर झाली नाही असेही यावेळी त्यांनी सांगितले. तर, पोलिसांनी केलेल्या चौकशीवर ही कारवाई आहे, दंडाधिकारी न्यायालयाने स्वतंत्रपणे चौकशी केली नाही, असा बचाव राणावतच्या वतीने एड रियाज सिद्दीकी यांनी केला होता. बावीस सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाची निकालपत्र त्यांनी सुनावणी दरम्यान अधोरेखित केली.

हेही वाचा: बाप्पाचे आगमन सुकर करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस डे-नाईट ऑन ड्युटीवर

कंगनाने एका व्रुत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोशल मीडियावर ही मुलाखत मोठ्या प्रमाणात वायरल झाली होती. मात्र हे आरोप तथ्यहिन आणि बोगस आहेत, असा आरोप अख्तर यांनी दंडाधिकारी न्यायालयात केलेल्या मानहानीच्या दाव्यात केला आहे. न्यायालयाने जुहू पोलीस ठाण्याला यावर चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे की अख्तर यांच्या तक्रारीत तथ्य आहे. त्यामुळे न्यायालयाने कंगनाला फेब्रुवारीमध्ये समन्स बजावले आहे. अंधेरी न्यायालयात ता 14 ला सुनावणी होणार आहे.

loading image
go to top