भूखंडांना सुरक्षा पुरवा कांजूरमार्ग प्रकरणानंतर पालिकेचे म्हाडा,जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

भूखंडांना सुरक्षा पुरवा कांजूरमार्ग प्रकरणानंतर पालिकेचे म्हाडा,जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

मुंबई: मोफत घरे मिळत असल्याची अफवा पसरल्यानंतर सरकारच्या मोकळ्या भुखंडावर अतिक्रमण झाल्याचा प्रकार रविवारी उघड झाला. हे अतिक्रमण महानगर पालिका आणि पोलिसांनी तत्काळ हटवले आहे. मात्र हे भुखंड जिल्हाधिकारी आणि म्हाडाच्या अखत्यातरीतील असल्याने सुरक्षा ठेवण्यासाठी पालिकेने संबंधित प्राधिकरणांना पत्र पाठवले आहे.

कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेडसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भुखंडाच्या बाजूलाच बांबू उभारुन चिध्या बांधून अज्ञात व्यक्तींनी भुखंड अडवुन ठेवल्याचा प्रकार उघड झाला आहे. मुंबईत मोफत घर मिळत असल्याची अफवा पसरल्यानंतर मुंबईतील काही भागांसह मुंब्रा, दिवा या भागातील नागरिकांनी या जागा अडवल्याची चर्चा सुरु आहे. भुमाफियांनी ही अफवा पसरवल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. शेकडो नागरिक घर मिळण्याच्या अपेक्षेने या भागात येत होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महापालिका आणि पोलिसांनी हे कच्चे अतिक्रमण हटवले. मात्र ही जागा जिल्हाधिकारी कार्यालय आणि म्हाडाच्या अखत्यारीत आहे.

महापालिकेच्या एस प्रभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.‘या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमण असलेले भुखंडांची मालकी असलेल्या संबंधित संस्थांना पत्र पाठवून याबाबत माहिती देण्यात आली आहे, असे सहाय्यक आयुक्त विभास आचरेकर यांनी सांगितले. पालिकेने म्हाडा आणि जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठवून त्यांच्या मालकीच्या भुखंडांची सुरक्षा ठेवण्याची सुचनाही केली आहे.

सर्वाधिक अतिक्रमण सरकारी भूखंडावर

मुंबईतील 34 हजार एकर भुखंडापैकी 8 हजार 171 एकर भुखंडांवर अतिक्रमण आहे. त्यापैकी सरकारी आणि महापालिकेचे 35 ते 40 टक्के, म्हाडाचे 15 ते 20 टक्के,15 ते 20 टक्के भुखंड हे खासगी मालकीचे असल्याचा अहवाल काही वर्षांपूर्वी एका संस्थेने जाहीर केला होता. रेल्वेसह मुंबई पोर्ट ट्रस्ट, सुरक्षा मंत्रालयाच्या भुखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Kanjurmarg case bmc send letter MHADA and District Collector

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com