कपिल, इरफानला हायकोर्टाचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई - बेकायदा बांधकाम केल्याप्रकरण विनोदी अभिनेता कपिल शर्माविरोधात मुंबई पालिकेने दाखल केलेल्या फौजदारी फिर्यादीला उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 23) हंगामी स्थगिती दिली. बेकायदा बांधकामप्रकरणी अभिनेता इरफान खानला बजावण्यात आलेल्या नोटिशीवर स्वतंत्र सुनावणी घेण्याचे आदेशही न्यायालयाने पालिकेला दिले. त्यामुळे या दोघांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

गोरेगाव येथील "देव लॅण्ड हाऊसिंग एन्क्‍लेव्हब' या 18 मजली टॉवरमध्ये नवव्या मजल्यावर शर्माचे घर आहे. त्याने व्हरांड्याजवळ बेकायदा बांधकाम केल्याचा पालिकेचा दावा आहे. पालिकेने या इमारतीला 2010 मध्ये संबंधित परवानग्या दिल्या. 18 मजले बांधण्याची परवानगीही 2013 मध्ये दिली. त्यानंतरही पालिकेने सोसायटीला तसेच चार सदस्यांना नोटीस बजावली आहे, अशी तक्रार करणारी याचिका शर्माने दाखल केली आहे. सोसायटीनेही याबाबत शहर दिवाणी न्यायालयात दावा केला असून त्या न्यायालयाने या नोटिशीला स्थगिती दिली आहे. तरीही पालिकेने स्वतंत्रपणे चारजणांना नोटीस बजावली असून शर्माविरोधात फौजदारी फिर्यादही दाखल केली आहे. या फिर्यादीला न्या. नरेश पाटील व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने हंगामी स्थगिती दिली.

संबंधित नोटिसा मागे घेत आहोत असे पालिकेच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित दावे व याचिकाही तथ्यहीन ठरतात. या पार्श्‍वभूमीवर पालिकेने पाच आठवड्यांत स्वतंत्र सुनावणी घेऊन संबंधित सदनिकाधारकांबाबत निर्णय द्यावा. सुनावणीनंतर कारवाई करण्याचा निर्णय झाल्यास सदनिकाधारक न्यायालयात याचिका करू शकतात असे स्पष्ट करत शर्मा, खान आणि विकसकाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिका खंडपीठाने निकाली काढल्या.

Web Title: kapil irfan highcourt comfort