बॉलिवू़ड प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या घरावर कोरोनाची 'ठकठक', दोन नोकर कोरोना 'पॉझिटिव्ह'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

कोरोना विषाणूचे संकट देशभरात आहे. मुंबई शहरात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सामान्य माणसांसोबतच सेलिब्रिटी देखील याला अपवाद नाही.

मुंबई : कोरोना विषाणूचे संकट देशभरात आहे. मुंबई शहरात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सामान्य माणसांसोबतच सेलिब्रिटी देखील याला अपवाद नाही. बॉलिवूडमध्येही आता कोरोनाने एन्ट्री केली आहे. बॉलिवूडमध्ये बरेच कलाकार क्वारंटाइन झाले आहेत. आधी बॉलिवूड निर्माते बोनी कपूर यांच्या घरातील नोकर पॉझिटिव्ह आढळले होते आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाइन केल्यानंतर आता आता बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरापर्यंत कोरोना येऊन थांबला आहे. करणच्या घरातील दोन नोकर पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे करण त्याच्या कुटुंबासह क्वारंटाइन झाला आहे.

महत्वाची बातमी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी, आठवड्याभरात मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर 'इतका' वाढला

करणच्या घरात काम करणारे दोन नोकरांना कोरोना विषाणूची लक्षण आढळली आहेत. त्याची चाचणी केली असता दोन्ही नोकर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याची माहिती करणने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, 'मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या घरातील दोन स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जेव्हा त्यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसून आली तेव्हा लगेचच त्यांना आमच्या इमारतीतील क्वारंटाइन भागात ठेवण्यात आले आहे. आम्ही  महानगरपालिकेला याची माहिती दिली आहे. त्यांनी आमची इमारतचे निर्जंतुकीकरण केले आहे. माझं कुटुंब सुरक्षित आहे आणि त्यांना कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. सकाळी आम्हा सर्वांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे आणि ती निगेटिव्ह आली आहे. पण इतरांच्या सुरक्षेसाठी आम्ही चौदा दिवसांसाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये असणार आहोत.

 

नक्की वाचा उत्तर प्रदेश सोशल मीडिया डेस्कला धमकी देणारा आला गोत्यात, महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यातून अटक

याशिवाय तो पुढे म्हणाला आहे की, पॉझिटिव्ह आढळलेल्या दोघांनाही चांगले उपचार दिले जातील. याशिवाय करणचे कुटुंब सुरक्षित असल्याचे आणि यासाठी तो काळजी देखील घेत आहे असे त्याने सांगितले आहे. करणने आजच त्याचा ४९ वा वाढदिवस त्याच्या कुटुंबासोबत घरीच साजरा केला आहे. याआधी बोनी यांच्या घरातील नोकर साहू हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे बोनी कपूर त्यांच्या मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्यासह कुटुंबात काम करणाऱ्या सर्वांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले होते.

in Karan Johar house,found two servants Corona positive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in Karan Johar house,found two servants Corona positive