ब्लॉक लेवल बॅडमिंटन स्पर्धेत करिष्मा खर्डीकर अव्वल

karishma
karishma

डोंबिवली - नेहरू युवा केंद्र ठाणे व महाराष्ट्र युवा केंद्र कल्याणच्या वतीने जिल्हास्तरीय ब्लॉक लेवल बॅडमिंटन स्पर्धा के. एम. अग्रवाल महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत डोंबिवलीतील करिष्मा खर्डीकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात करिष्माने निशिता ठक्करला 21-18 असे शेवटच्या सेटमध्ये हरवत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत कल्याण-डोंबिवली आणि ठाणे येथील 80 खेळाडू सहभागी झाले होते. 

यापूर्वी करिष्माने अनेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे करिष्मा खर्डीकरने दहावीची परीक्षा सुरु झाल्याने सराव एक महिना बंद असतानाही काही दिवसाच्या सरावाच्या जोरावर या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. करिष्माने वयाच्या 9 व्या वर्षी खेळायला सुरुवात केली. करिष्मा सध्या मुंबई येथे गुरुकुल अकादमीमध्ये बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत असून, आजपर्यत तिने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. करिष्मा सायना नेहवालला आपला आदर्श मानते आणि यापुढे असाच उत्कृष्ठ खेळ करत देशाचे प्रतिनिधित्व करायचे तिचे मुख्य ध्येय आहे. 

कल्याण येथील पार पडलेल्या स्पर्धेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करिष्माला पारितोषिक सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. करिष्माला मुंबई येथे जिल्हास्तरीय स्पर्धेत सलग दोन वर्ष, अंधेरी येथील मनोरा बॅडमिंटन स्पर्धेत 15 वर्षाखालील गटात आणि वरळी येथील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. एकता कल्चरल पुरस्कार, जीवन विद्या मिशनतर्फे पुरस्कार, कांचनगौरी महिला पतपेढी तर्फे भरारी खेळरत्न पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com