कर्जतमध्ये बिगुल वाजले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

मुंबई : कर्जत तालुक्‍यात 13 डिसेंबर 2019 मध्ये मुदत संपत असलेल्या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होणार आहेत. मात्र टेम्बरे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन तयार झालेल्या रजपे आणि जामरुख ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. 

तालुक्‍यातील नेरळ, उमरोली, वाकस, तिवरे आणि वरई या पाच ग्रामपंचायतींची मुदत या वर्षअखेरीस संपत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 13 डिसेंबर 2019 मध्ये मुदत संपत असलेल्या कर्जत तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

1 ऑगस्ट रोजी पाच ग्रामपंचायतींमधील थेट सरपंच आणि सदस्यांसाठी निवडणूक अधिसूचना जाहीर होणार आहे. त्यानुसार 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट यादरम्यान नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तर 19 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून 21 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत वैध ठरलेले नामांकन अर्ज मागे घेता येणार आहेत. 31 ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत मतदान घेतले जाईल. तर 3 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार असल्‍याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karjat election