कशेळे बाजारपेठेत रस्‍त्‍याची दुरवस्‍था

कशेळे बाजारपेठेत रस्‍त्‍यावर पडलेले खड्डे.
कशेळे बाजारपेठेत रस्‍त्‍यावर पडलेले खड्डे.

कर्जत : कशेळे-खांडस रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी देण्यात आले होते. मात्र या कामात समावेश असलेल्या कशेळे बाजारपेठेतील १२५ मीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण अजूनही संबंधित ठेकेदाराने केलेले नाही; त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. हा रस्ता मुख्य बाजारपेठेतील असल्याने व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागानेही याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.

कशेळे हे कर्जत तालुक्‍यातील मध्यवर्ती आणि बाजारहाटी गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे कशेळे; तसेच आजूबाजूच्या गावांतील नागरिकांची बाजार करण्यासाठी दररोज बाजारपेठेत वर्दळ लागलेली असते. तसेच कशेळे-खांडस हा रस्ता परिसरातील एक प्रमुख रस्ता असून पाथरज, नांदगाव येथे मोठ्या प्रमाणावर फार्महाऊस असल्याने नेहमीच या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. पावसाळ्यापूर्वी खांडस रस्त्याचे काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले. रस्त्याचे काँक्रीटीकरण मंजूर असूनही येथे कामाला सुरुवात करण्यात आली नाही. 

कशेळे-खांडस रस्त्यावरील काही अतिक्रमणे हटवल्यानंतर आणि पावसाळा संपल्यावर लगेचच कामाला सुरुवात करण्यात येईल; तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे लवकरच खडी टाकून बुजवण्यात येतील.    
 - जी. ए. गवळी, उप-अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत- २

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com