esakal | नेरळनंतर आता कर्जत बाजारपेठेबाबतही मोठा निर्णय... वाचा बातमी सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

नेरळनंतर आता कर्जत बाजारपेठेबाबतही मोठा निर्णय... वाचा बातमी सविस्तर

कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी कर्जत शहराची काळजी घेण्यासाठी व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना तसेच सर्व छोटे मोठे उद्योगधंदे, दूध, भाजीपाला व्यापाऱ्यांना कोरोनाची चैन तोडण्यासाठी प्रयत्न करण्याचे व स्वतःहून बाहेर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

नेरळनंतर आता कर्जत बाजारपेठेबाबतही मोठा निर्णय... वाचा बातमी सविस्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कर्जत/नेरळ :कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी कर्जत शहराची काळजी घेण्यासाठी व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना तसेच सर्व छोटे मोठे उद्योगधंदे, दूध, भाजीपाला व्यापाऱ्यांना कोरोनाची चैन तोडण्यासाठी प्रयत्न करण्याचे व स्वतःहून बाहेर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कायदा लागू
नेरळमध्ये प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कायदा लागू करून सर्व परिसर सील करण्यात आला आहे. बाधित क्षेत्रात प्रवेश करुन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा रायगड जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष डॉ निधी चौधरी यांनी दिला आहे. नेरळमधील बाजारपेठ, बँका, दूध, भाजीपाला यांची दुकानेही 4 दिवस 100 टक्के बंद ठेवण्याचे आदेश नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा यांनी दिले आहेत.

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा
 

त्या रुग्णाच्या कुटुंबियांचीही चाचणी
नेरळ येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे कुटुंबीय यांना काल सायंकाळी पनवेल येथील ग्रामविकास भवन मध्ये नेण्यात आले आहे.त्यांची आज पनवेल येथील कोविड उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केली जाणार आहे. त्यांचे अहवाल आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह तरुण यांच्या संपर्कात आलेले त्याचे नातेवाईक आणि मित्र यांचीही कोरोना तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. त्या कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्यांची यादी पोलिसांनी गोळा केली आहे.
 

loading image