दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

कर्जत - कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मूकबधिर निवासी शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शाळेचा काळजीवाहक राम बेंबरे (वय 44) याला कर्जत पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी "पॉक्‍सो'अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दोन्ही मुली लहानपणापासून मूकबधिर आहेत. मूकबधिर शाळेत त्या तीन वर्षांपासून शिकत आहेत. चार दिवस सुटी असल्याने या मुलींना त्यांचे पालक घरी नेरळ येथे घेऊन गेले. या मुलींना त्रास होत होता. त्याबाबत त्यांना घरच्यांनी विचारले असता रात्री घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावरून सर्व प्रकार लक्षात येताच या मुलींच्या आईने कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर कर्जत पोलिसांनी संशयित म्हणून शाळेतील काळजीवाहक बेंबरे याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: karjat mumbai news girl Atrocity