विजेच्या धक्‍क्‍याने तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

कर्जत - कर्जतपासून जवळच असलेल्या डिकसळ येथे विजेच्या तुटलेल्या तारांवर पाय पडून नरेश मनोहर गवळी (वय 38) यांचा आज सकाळी मृत्यू झाला.

कर्जत - कर्जतपासून जवळच असलेल्या डिकसळ येथे विजेच्या तुटलेल्या तारांवर पाय पडून नरेश मनोहर गवळी (वय 38) यांचा आज सकाळी मृत्यू झाला.

गवळी हे डिकसळमधील पोतदार वसाहतीत राहत होते. भिवपुरी रेल्वे स्थानकाकडे ते रविवारी सकाळी कामानिमित्त जात होते. काही अंतरावर रस्त्यावर खांबावरील तार तुटून पडली होती. तिच्यावर पाय पडताच त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: karjat news youth death by electric shock