मुंबईला निघालेल्या कर्णावती एक्सप्रेसचे काही डबे इंजिनापासून झाले वेगळे; गती कमी असल्याने टळला मोठा अनर्थ

संजय घारपुरे
Wednesday, 29 July 2020

अहमदाबादहून मुंबईला निघालेल्या कर्णावती एक्सप्रेसचे काही डबेच अचानक ट्रेनपासून वेगळे झाले आणि एकच गोंधळ ऊडाला

 

मुंबई ः देशात अनलॉक सुरु झाले असले तरी रेल्वेसेवा पूर्ण जोषात सुरु झालेली नाही. खूपच कमी ट्रेन धावत आहेत, पण त्यानंतरही आता प्रश्न दिसू लागले आहेत. अहमदाबादहून मुंबईला निघालेल्या कर्णावती एक्सप्रेसचे काही डबेच अचानक ट्रेनपासून वेगळे झाले आणि एकच गोंधळ ऊडाला. 

सुशांत केस अपडेट: बिहार पोलिसांची स्पेशल टीम मुंबई क्राईम ब्रांच ऑफीमध्ये पोहोचली, तपास सुरु

अहमदाबादहून मुंबईला येत असलेल्या 02934 कर्णावती कोविड स्पेशल ट्रेनचे डबे बडोदा स्टेशन जवळ वेगळे झाले. ही ट्रेन बडोद्याहून सकाळी 6.30 वाजता निघाली आणि विश्वामित्री स्थानकाजवळ येत असताना ही घटना घडली. त्यावेळी डब्यांना जोडणारे कपलिंग निघाले, त्यामुळे इंजिन आणि दोन डबेच पुढे निघाले. 

या ट्रेनमध्ये असलेल्या विकास शर्मा या प्रवाशाने ट्वीटरवरुन या घटनेचा व्हिडिओ ट्वीट केला. अर्ध्या तासात ट्रेनला निघालेले हे डबे जोडण्यात आले आणि ती मुंबईकडे रवाना झाली. रेल्वे आधिकाऱ्यांनी ही घटना सकाळी 6.50 च्या सुमारास घ़डली. लगेचच गार्डना ट्रॅकवर बोलावण्यात आले. निघालेले रेक ट्रेनला जोडून ती मुंबईला रवाना झाली. या घटनेची आम्ही चौकशी करीत आहोत, असे सांगताना रेल्वे आधिकाऱ्यांनी हे ब्रेक बायडिंगमुळे किंवा ट्रॅकच्या प्रॉब्लेममुळे घडले असावे असा अंदाज व्यक्त केला. 

"ऍप डाउनलोड करा आणि रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण तपासा", असा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर सावधान...

दरम्यान यावेळी ट्रेनची गती जास्त नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असे मानले जात आहे. ट्रेनचा स्पीड जास्त असता तर सुटे झालेले डबे कोलमडण्याची भिती होती. मात्र यामुळे ट्रेनला अर्धा तास उशिर झाला. त्यात कोणालाही कसलीही दुखापत झाली नाही असे सांगण्यात आले.

------------------------------------------------------

Edited By Tushar Sonawane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karnavati express coaches separated in running position near vadodara