काश्‍मीरप्रश्‍नी शेकाप मवाळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

मुंबई : मोदी सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील ३७० कलम रद्द केल्याने शेकापसह डाव्या आघाडीने याविरोधात भूमिका घेतली असताना शेकापचे पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांनी मात्र केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. आपण केंद्र सरकारच्या पाठीशी असल्याची भूमिका त्‍यांनी गुरुवारी मांडली.

मोदी सरकारने काश्‍मीर प्रश्‍नी घेतलेल्या भूमिकेबद्दल डाव्या पक्षांनी केलेल्या विरोधाबद्दल भूमिका स्पष्ट करण्यासाठी आमदार धैर्यशील पाटील यांनी गुरुवारी पेण येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य महादेव दिवेकर, प्रभाकर म्हात्रे, डी. बी. पाटील, नीलिमा पाटील, पेण पंचायत समिती सभापती स्मिता पेणकर, नगरसेवक शोमेर पेणकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयप्रकाश ठाकूर, बापू दळवी, राजा पाटील यांच्यासह सुमारे २०० प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

धैर्यशील पाटील म्हणाले की, देशाच्या अखंडतेसाठी केंद्र सरकारने घेतलेले हे पाऊल आहे. पंतप्रधान जेव्हा निर्णय घेतात तेव्हा तो संपूर्ण देशाचा निर्णय असतो. या वेळी जाती भेद, धर्मभेद व पक्षभेद विसरून पाठराखण केली पाहिजे. आम्ही सर्व मंडळी सरकारच्या या भूमिकेच्या पाठीशी आहोत. धर्म, पक्ष, जात यापेक्षा देश मोठा आहे. सरकारच्या या निर्णयाचा पुढील पाच वर्षांत सकारात्मक परिणाम दिसेल. शेकापची भूमिका ही राष्ट्रहिताची राहिली आहे. शेकापच्या तीन आमदारांपैकी मी एक आमदार असल्याने आपण मांडत असलेली भूमिका ही शेकापची खरी भूमिका असल्याचे एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kashmir Question Shakap Mowal