काश्‍मिरी चरस प्रकरण आणखी दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई, - केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अंधेरीतून हस्तगत केलेल्या चार किलो उच्च प्रतीच्या काश्‍मिरी चरस प्रकरणात आणखी दोघांना अटक केली. शशिकांत प्रभू व हर्षद गावडे अशी त्यांची नावे आहेत. यातील शशिकांत हा कुडाळमधील नेरूर येथील रहिवासी आहे, तर हर्षद हा विक्रोळी पूर्व येथील टागोरनगर येथील रहिवासी आहे. 

एनसीबीने 14 मार्चला अंधेरीतील इन्फिनिटी मॉलजवळ केलेल्या कारवाईत चार किलो चरससह रवी कुमार (वय 38), सलीम खान (33) आणि अनुप गुप्ता (29) यांना अटक केली होती. यातील रवी कुमार हा हिमाचल प्रदेश, खान हा मुंबईतील जोगेश्‍वरी व गुप्ता हा अंधेरी पश्‍चिम येथील रहिवासी आहे. या तिघांकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुंबईतील एका बड्या ड्रग्स विक्रेत्याला चरस विकण्यासाठी आल्याची माहिती त्यांनी दिली होती. यावेळी चौकशीत शशिकांत व हर्षद यांचीही नावे आल्याने एनसीबीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. 

Web Title: Kashmiri Charas case mumbai

टॅग्स