काश्‍मिरी तरुणाकडून  दोन किलो चरस जप्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

मुंबई - पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यातील शीळ फाटा येथे गुलाम खान या काश्‍मिरी तरुणाला अटक करून सुमारे दोन किलो चरस हस्तगत केले. ठाणे न्यायालयाने त्याला 10 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

एक काश्‍मिरी तरुण अमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसने सोमवारी (ता. 12) शीळ फाटा रोड येथे सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडे एक किलो 800 ग्रॅम चरस सापडले. या चरसची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. गुलाम खान हा जम्मू-काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहेलगाम येथील रहिवासी आहे. 

Web Title: Kashmiri youth seized two kg charas

टॅग्स