कस्तुरीरंगन समिती सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

कस्तुरीरंगन, श्यामलाल सोनी आणि राज्यपालांच्या भेटीदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या संभाव्य कुलगुरूंच्या नावाची यादी सादर करण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी ही नवी समिती स्थापन करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन आणि सदस्य डॉ. श्यामलाल सोनी व भूषण गगराणी (उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सिडको) यांनी आज (शनिवार) राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली.

कस्तुरीरंगन, श्यामलाल सोनी आणि राज्यपालांच्या भेटीदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या संभाव्य कुलगुरूंच्या नावाची यादी सादर करण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी ही नवी समिती स्थापन करण्यात आली आहे.

Web Title: Kasturiranjan Committee Meet Governor Vidyasagar Rao