शिवसेना भाजपची ताकद समान! कल्याण लोकसभा ग्रामपंचायतीत प्रत्येकी पाच ग्रामपंचायतीवर सत्ता

शिवसेना भाजपची ताकद समान! कल्याण लोकसभा ग्रामपंचायतीत प्रत्येकी पाच ग्रामपंचायतीवर सत्ता

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदार संघातील चौदा ग्रामपंचायतींतील सरपंच - उपसरपंच पदाच्या निवडणूका पार पडल्या आहेत. शिवसेना भाजप दोन्ही पक्षाकडून या मतदार संघात वर्चस्वाचा दावा केला जात होता. परंतू मनसे, राष्ट्रवादीची ताकदही गावात असल्याने त्यांची मदत घेत सरपंच पद मिळवित सेना भाजपने ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. शिवसेना भाजपला प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींवर, राष्ट्रवादीला तीन व मनसेला एका ग्रामपंचायतीवर आपली सत्ता स्थापन करता आली आहे. मनसेच्या पाठिंब्यामुळे दोन ठिकाणी सेनेला तर एका ठिकाणी भाजपला आपली सत्ता स्थापन करता आली असून मनसेचे वर्चस्वही ग्रामीण भागात जास्त असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागात दोन्ही पक्षांना समान जागांवर समाधान मानावे लागल्याने येत्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीवर याचा काय परिणाम होतो हे आता पहावे लागेल. 

कल्याण लोकसभा मतदार संघातील चुरशीच्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष सरपंच निवड प्रक्रीयेकडे लागले होते. यातील पिंपरी, वाकलन, दहिसर, नागाव, नारीवली व काकडवाल या ग्रामपंचायतींचा निवडणुकीवर बहिष्कार होता. तर इतर चौदा ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना 5, भाजप 5, राष्ट्रवादी 3 व मनसेने 1 ग्रामपंचायतीतील सरपंच बसवित ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. म्हारळ ग्रामपंचायतीत सेनेचा सरपंच करण्यासाठी मनसेने त्यांना पाठींबा दिल्याचे दिसून आले, तर उसाटणे येथे मनसे व राष्ट्रवादीचा पाठींबा मिळाला. पोसरी ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यासाठी भाजपला मनसेचा पाठींबा मिळाला. शिवसेना भाजपाकडून जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर वर्चस्वाचा दावा केला जात असला तरी एकहाती वर्चस्व दोन्ही पक्षांना मिळविता आलेले नाही. शिवसेना - भाजपचा बालेकिल्ला असलेल्या ग्रामपंचायतीतही दोन्ही पक्षांना फटका बसला असल्याचे दिसून आले आहे.

ग्रामपंचायत निवडणुक निकालाचा काही प्रमाणात परिणाम महापालिका निवडणुकांवर होत असल्याने येत्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेला भाजप जोरदार टक्कर देणार अशी चर्चा आहे. त्यासोबतच मनसेचे केवळ 10 नगरसेवक पालिकेत असले तरी ग्रामीण भागात मनसेची ताकद वाढली असताना पालिका हद्दीतही मनसेची ताकद वाढणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादीनेही आपली ताकद दाखवून दिली असून येणाऱ्या महापालिका निवडणूकीत नगरसेवकांची संख्या वाढते का हे पहावे लागेल. ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेस कोठेही दिसली नसल्यामुळे आणि महापालिकेत फक्त 4 नगरसेवक असल्याने त्यांचे नामोनिशाण मिटले जात आहे का याची चर्चा रंगू लागली आहे. 

ग्रामपंचायत सरपंच पद
वडवली शिरढोन शिवसेना
खोणी शिवसेना
म्हारळ  शिवसेना मनसे पाठिंबा
काकोळे मनसे
खरड शिवसेना 
पोसरी भाजप - मनसे
वरप राष्ट्रवादी
कांबा राष्ट्रवादी
मांगरूळ भाजप - शिवसेना
नाऱ्हेन भाजप
उसाटने शिवसेना -  मनसे - राष्ट्रवादी
बुद्रुल  राष्ट्रवादी
मलंगवाडी भाजप
नेवाळी  भाजप


बहिष्कार टाकलेल्या ग्रामपंचायती
पिंपरी, वाकलन, दहिसर, नागाव, नारीवली आणि काकडवाल

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

kayan political marathi news ShivSena BJPs strength is the same Kalyan Lok Sabha Gram Panchayat mumbai politics updates

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com