
देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.
Covid Vaccination : कोविड-19 लसीकरणकरिता नाकावाटे घ्यावयाचे इन्कोव्हॅक वापरावे; केडीएमसीचे आवाहन
डोंबिवली - देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.
कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकाराने 60 वर्षावरील ज्येष्ठ व वृद्ध नागरिकांना नाकावाटे इन्कोव्हॅक लस देण्याची मोहिम हाती घेतली आहे. इन्कोव्हॅक ही नाकातून दिली जाणारी जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांवर इन्कोव्हॅक लस 28 एप्रिल पासून दिली जात आहे. कोविन पोर्टलवर लसीकरण केंद्रांची माहिती उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 28 एप्रिल पासून इन्कोव्हॅक ही लस 60 वर्षावरील नागरिकांना मोफत देण्यात येत आहे.
कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक लसीची मात्र घेता येईल. त्याव्यतिरिक्त कोणत्याही लसीची मात्र घेतलेल्या नागरिकांना ही लस घेता येणार नाही. तरी 60 वर्षांवरिल नागरिकांनी महानगरपालिकेच्या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.