MMRDA : रस्ते काँक्रीटीकरणासाठी कल्याण-डोंबिवलीत खर्च करणार २५१ कोटी

MMRDA
MMRDAsakal media

मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक (KDMC Election) डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी सरकार (mva government) कामाला लागल्याचे दिसत आहे. महानगरपालिका हद्दीतील अनेक रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी (Road Concrete work) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) तब्बल २५१ कोटी रुपये खर्च करणार आहे. या कामाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यासाठी प्राधिकरणाने निविदा मागवल्या आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे येथे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महापालिकेवर आपला झेंडा फडकावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष कामाला लागले आहेत. त्यानुसार या भागात विविध कामे करून मतदारांना आपलेसे करण्याचे प्रयत्न नेत्यांकडून सुरू झाले आहेत. एमएमआरडीएचे अध्यक्ष आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातील रस्ते वाहतूक गतिमान करण्यावर भर दिला आहे. प्राधिकरणाच्या बैठकीमध्येही ठाणे, कल्याण- डोंबिवली या भागातील विविध कामांना मंजुरी दिली आहे.

या रस्त्यांचे क्राँक्रीटीकरण

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील मोठा गाव डोंबिवली ते कोपर रोड स्थानकापर्यंतच्या सर्विस रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण होणार आहे. तसेच जुना डोंबिवली रोड, डोंबिवली पश्चिम ते जुना डोंबिवली रेल्वे स्थानक क्रॉसिंग रोड, आंबेडकर चौक ते जगदीश डेरी कल्याण पूर्व, क्रिस्टल प्लाझा ते लोकग्राम कल्याण पूर्व, विठ्ठलवाडी स्टेशन ते सूर्य शाळा कल्याण पूर्व अशा विविध मार्गांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com