केडीएमसी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; कोरोना काळात पालिकेचा 'मोठा' निर्णय

केडीएमसी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; कोरोना काळात पालिकेचा 'मोठा' निर्णय
केडीएमसी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; कोरोना काळात पालिकेचा 'मोठा' निर्णय

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी वर्ग झटत आहे. या अधिकारी-कर्मचाऱ्यांना 50 लाखांची सुरक्षा विमा कवच योजना लागू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या योजनेचा लाभ कंत्राटी कामगारांसह सर्वच कर्मचारी, अधिकाऱ्यांना मिळणार असल्याने पालिका वर्तुळातून समाधान व्यक्त होत आहे.

पालिकेच्या विविध विभागांमध्ये 5 ते 6 हजार कर्मचारी-अधिकारी कार्यरत असून त्यातील विविध विभागातील बहुतांश अधिकारी-कर्मचारी वर्ग आपल्या जिवाची पर्वा न करता करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढा देत अाहे. पालिका कर्मचारी वर्गाला 50 लाखांचा सुरक्षा विमा कवच द्यावे, अशी मागणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह लोकप्रतिनिधी, कामगार संघटना, सामाजिक संस्थांनी केली होती. याची दखल घेत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार पालिका प्रशासनाने 10 जुलैला आदेश काढत सुरक्षा विमा कवच योजना जाहीर केली आहे.

...तरच मिळणार योजनेचा लाभ
या योजनेत अटी आणि शर्था लागू असून एखादा कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला कोरोनाची लागण झाल्यास त्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्यानंतरच या योजनेअंतर्गत 50 लाखांची मदत मिळणार आहे. त्यासाठी पालिकेकडे अर्ज करावा लागणार आहे. या योजनेची अंमलबजावणी आणि निर्णय घेण्यासाठी सदर अर्जाच्या छाननीसाठी पालिका अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली असून पालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मुख्य लेखा परीक्षक , संबंधित विभाग प्रमुख आणि सामान्य प्रशासन उपायुक्त यांचा या समितीत समावेश अाहे. समितीने अर्जाची छाननी करून तो अर्ज आयुक्त यांच्याकडे शिफारस केल्यावर मदत मिळणार आहे.

-----------------------------------

(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com