कल्याण-डोंबिवली आजारी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

कल्याण - यंदा दीड-दोन महिन्यांत कल्याण-डोंबिवलीच्या शहरी व ग्रामीण भागात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला. त्यानंतर ताप, गॅस्ट्रो, कावीळ, टायफॉईड, डेंगी, लेप्टो आदी आजारांचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली असून साथरोग नियंत्रणामध्ये असल्याचा दावा केला आहे. सखल भागांत घुसलेले पावसाचे पाणी आणि सततच्या हवामान बदलामुळे आता ताप आणि पोटाचे आजार वाढले आहेत. साथरोगाचे रुग्णही वाढले आहेत. 

भोंगळ कारभार कारणीभूत
पालिकेच्या विविध विभागांतील समन्वयाचा अभाव आणि अर्धवट कामांचा भुर्दंड नागरिकांना पडत आहे. सर्वात जास्त त्रास कल्याण पूर्व आणि २७ गावांतील नागरिकांना होत आहे. साचलेला कचरा, अर्धवट नालेसफाई, खड्ड्यांत गेलेले रस्ते, नाल्यांची अर्धवट बांधणी, परिणामी घराघरांत घुसलेले पाणी आणि मलनिस्सारण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. अनेक ठिकाणी अर्धवट चाळ आणि इमारतींच्या कामात पावसाचे पाणी जाण्यास जागा नसल्याने जागोजागी पूरस्थिती झाली होती. आता पाऊस थांबताच त्याचा त्रास नागरिकांना सुरू झाला आहे. १ जून ते २७ जुलै २०१८ दरम्यान पालिका हद्दीत डेंगीचे ८८ संशयित रुग्ण सापडले. लेप्टोसदृश दोन रुग्ण आढळले. आले. एका संशयित लेप्टो रुग्णाचा मृत्यू झाला.

पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी नुकतीच आरोग्य विभागाची बैठक घेतली. पालिकेचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नेमून सर्वेक्षण आणि उपाययोजना सुरू आहेत. साथ रोगाचे रुग्ण वाढत असले तरी ते नियंत्रणात आहे. 
- डॉ. राजू लवांगरे, पालिका आरोग्य अधिकारी.

Web Title: KDMC health issue