esakal | 'KDMC' च्या पाठबळामुळे अनधीकृत बांधकामे वाढली; समाजसेवकांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

saurabh Tamhankar

'KDMC' च्या पाठबळामुळे अनधिकृत बांधकामे वाढली; समाजसेवकांचा आरोप

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) क्षेत्रात सरकारी भूखंड (Government Land) बळकावून त्यावर अनधिकृत बांधकाम (Illegal work) उभारणे सुरूच आहे. माझ्याही पाहणीत एक भूखंड असून त्यावर बांधकाम उभारतो. त्याला नळ पाणी व वीज जोडणीचे हमीपत्र द्यावे अशी मागणी डोंबिवलीतील समाजसेवक सौरभ ताम्हणकर (Saurabh tamhankar) यांनी थेट पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (Dr vijay suryavanshi) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामांत वाढ होत आहे. अशा बांधकामांना नळ पाणी व विज जोडणीची देखिल परवानगी देण्यात येते. ही बाब मी यापूर्वी अनेकदा पालिकेच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे मी देखील आता एका सरकारी भूखंडावर बांधकाम करतो. ते काम पूर्ण झाले की त्याला नळ पाणी व वीज जोडणीचे हमीपत्र द्यावे अशी मागणी मी पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्याकडे केल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.

“सरकारी भुखंडच मी बळकावणार असल्याने माझा जमिन विकत घेण्याचा खर्च वाचेल. त्याचप्रमाणे इमारत अनधिकृत असल्याने शासकिय फी चा देखिल खर्च वाचणार आहे. त्यामुळे मी माझ्या इमारतीमधील सदनिका बाजार भावापेक्षा कमी किमतीने विकेन व यामुळे मला ग्राहकांचा देखिल उदंड प्रतिसाद मिळेल अशा बांधकामामुळे काही आंदोलने व मोर्चे होवू शकतात मात्र त्याची भिती पालिकेने बाळगू नये अथवा कोणी मा. उच्च न्यायालयात सदर बांधकामाविरूद्ध दावा दाखल केल्यास पालिकेच्या वतीने लागणारा सर्व न्यायालयिन खर्च देखिल मी उचलण्यास तयार असल्याचे या पत्रात ताम्हणकर यांनी म्हटले आहे.

"कल्याण डोंबिवलीत महापालिका परिक्षेत्रात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढत आहे. हे वाढणारे प्रमाण पालिका प्रशासनाचे अप्रत्यक्षपणे त्याला पाठबळ असल्याने हे प्रमाण वाढत आहे. हे आम्हाला अधोरेखित करायचे असल्याने आज मी पालिका आयुक्तांना पत्र दिले आहे."

- सौरभ ताम्हणकर, डोंबिवलीकर

loading image
go to top