त्या एका कोरोनाग्रस्तामुळे महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाईन

त्या एका कोरोनाग्रस्तामुळे महापौरांसह सर्व वऱ्हाडी होम क्वारंटाईन

डोंबिवली : डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या लग्न व हळदी समारंभात सहभागी झालेल्या एका युवकाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. होम क्वांरंटाईन  असताना देखील हा युवक सोहळ्यात सामील झाल्यामुळे त्याच्यासह  अन्य 9 लोकांवर गुन्हे दाखल।करण्यात  आले आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे यासुद्धा या सोहळ्यास उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्यासह सर्व व-हाडी मंडळींना होम क्वारंटाईनचे आदेश देण्यात आले आहेत. 

हा तरुण तुर्कीहून डोंबिवली आल्यानंतर आपल्या भावाच्या लग्नात  सहभागी झाला होता. या तरुणाच्या घरातील तिघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. मात्र सहभागी झालेल्या एका तरुणीलाही कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. या लग्नात महापौर विनिता राणे यांनी आपल्या नगरसेवक पतीसह  हजेरी लावली होती. विशेष म्हणजे एका माजी नगरसेविकेच्या घरातील हे लग्न असल्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी या लग्नात सहभागी झाले होते.त्यामुळे राणे यांच्यासह सर्व व-हाडी मंडळीना 14 दिवस विलगीकरणात राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. 

दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी करू नये, नियोजित कार्यक्रम तुर्तास रद्द करावे अशा सूचना वारंवार देत आहे. महापौर राणे यांनीही स्वतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेऊन  आढावा घेतला होता. मात्र, लोकप्रतिनिधीच आदेश धाब्यावर बसवून बेजबाबदारपणे वागत असतील तर नागरिकांनी काय करावे असा प्रश्न  निर्माण झाला आहे. याप्रकरणी राणे यांच्याची संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com