कल्याण परिसरात दमदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

कल्याण - अनेक दिवस दांडी मारलेल्या पावसाने कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात शनिवार (ता. २३)पासून विजेच्या कडकडाटात दमदार हजेरी लावली. डोंबिवलीतील सरोवरनगरमधील चाळीवर मध्यरात्री वीज कोसळून तीन ते चार घरांच्या पत्र्यांना तडे गेले. १३ झाडे पडली असून, छोटे नाले आणि गटारे साफ न झाल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

मागील २४ तासांत १५१ मिमी पावसाची नोंद झाली. कल्याण रेल्वेस्थानकात पहाटे काही काळ रेल्वे लाईनवर पाणी साचले, तर कल्याण पूर्वेकडे जाणाऱ्या बोगद्यात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना रेल्वेस्थानक गाठण्यात तारेवरची कसरत करावी लागली.

कल्याण पूर्व हाजीमलंग रस्त्यावरील अर्धवट रस्ते, सखल भाग, पाणी निचरा होण्यास जागा नसल्याने १०० फूट रोड पावसाच्या पाण्याने तुडुंब वाहत होता. पिसवली, नांदवलीतील सात ते आठ इमारतींचा संपर्क तुटला होता. टिटवाळ्यातील मोहने अटाळी, बल्याणी परिसरात पाणी साचले होते.

कल्याण पश्‍चिम, म्हसोबा मैदान योगीधाम, कल्याण पूर्व गणेशनगर आदी परिसरात १३ झाडे पडली. पश्‍चिमेतील जुने मनीषानगर, तपोवन सोसायटी परिसरात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. डोंबिवलीतील रामनगर, फडके रोड, सुखी जीवन सोसायटी, शिवसृष्टी सोसायटी आदी परिसरात पाणी साचले होते.

पालिकेच्या आपत्कालीन विभागातून सूचना मिळताच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी कल्याण पूर्व, हाजीमलंग रोड, डोंबिवली, टिटवाळा आणि कल्याण पश्‍चिमेत पाहणी करून अधिकाऱ्यांना त्वरित काम करण्याच्या सूचना दिल्या.

डोंबिवलीत काही घरांवर वीज कोसळल्याबाबत तहसीलदार यांना कळविले आहे. ते पंचनामा करतील. कल्याण-डोंबिवलीत पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी केली. प्रत्येक प्रभाग क्षेत्र कार्यालयात सीबी आणि कर्मचारीवर्ग सज्ज ठेवण्यासह सखल भागातील नागरिकांना सूचना देण्याचे आदेश दिले आहेत. 
- संजय घरत, अतिरिक्त आयुक्त, पालिका
 
Web Title: kdmc mumbai news rain