राजकीय पक्षांना दिवा खुणावतेय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

डोंबिवली - बेकायदा बांधकामांचे माहेरघर अशी ओळख असणारा दिवा अलीकडे बिल्डरांचा दिवा म्हणून प्रकाशात आले आहे. मुंबईचे बलाढ्य विकसक ठाण्यानंतर दिव्याच्या प्रेमात पडल्याचे दिसते. सध्या दिवा आणि परिसरात सुरू असलेले भव्य गृहसंकुलांच्या प्रकल्पांमध्ये घर घेणे नागरिकांच्या खिशाला परवडत असल्याने या भव्य दिव्य प्रकल्पांवर राजकीय पक्षांचा डोळा असल्याची कुजबूज सध्या शहरात सुरू आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासापेक्षा विकसकांचा विकास कसा होईल आणि राजकीय दबाव टाकत माया कशी पदरात पाडून घेता येईल, यासाठी दिव्यात अधिराज्य गाजवण्याचे स्वप्न राजकीय पक्ष पाहत आहेत. कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांचा परिसर, शिळ फाटा, दिवा, आगासन परिसरात सध्या अनेक विकसकांचे प्रकल्प सुरू आहेत, तर काही नव्याने सुरू होणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बिल्डर यांचे साटेलोटे हे सर्वश्रुत आहेत. विशेष म्हणजे, दिवा परिसरात सुरू असलेल्या प्रकल्पांना स्थानिक राजकीय मंडळीच रेती, विटा, सिमेंट इत्यादी कच्चामाल विकत आहेत. यातून त्यांची चांगलीच कमाई होत आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रकल्प उभारले जाणे हे राजकीय मंडळीच्या फायद्याचेच ठरत आहे. दिवा परिसरात झपाट्याने विकास सुरू असून, शहरालगतच्या जमिनी विकसकांसाठी कशा खुल्या होतील, याची पुरेपूर काळजीही घेतली जात आहे. त्यामुळे समस्यांची बजबजपुरी असलेल्या दिव्यात विकसक तुपाशी आणि नागरिक उपाशी असे चित्र आहे.

Web Title: kdmc political party