केडीएमसी परिवहन समितीची सभापती निवडणूक 10 मार्चनंतर? 

केडीएमसी परिवहन समितीची सभापती निवडणूक 10 मार्चनंतर? 

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीनंतर आता सभापतिपदाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. ही निवडणूक 10 मार्चनंतर होण्याची शक्‍यता पाहता इच्छुकांनी पालिका मुख्यालय ते ठाणे येथील वरिष्ठ नेत्यांची भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता असताना 15 फेब्रुवारीला परिवहन समितीच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली. निवडणुकीमध्ये 6 व्या जागेसाठी मनसे आणि भाजप उमेदवाराला समान मते पडली; मात्र महापौर विनीता राणे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून भाजप उमेदवाराला मतदान केल्याने शिवसेनेचे 3 आणि भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीनंतर आता सभापतिपदाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. आता परिवहन समितीमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता असून शिवसेनेचे मधुकर यशवंतराव, मनोज चौधरी, संजय पावशे, सुनील खारुक, अनिल पिंगळे, बंडू पाटील, भाजपचे संजय राणे, संजय मोरे, कल्पेश जोशी, प्रसाद माळी, स्वप्नील काटे आणि दिनेश गोर असे एकूण 12 सदस्य आहेत. युतीच्या करारानुसार या वर्षी सभापती शिवसेनेचा विराजमान होणार असल्याने शिवसेना सदस्यांनी आपणच परिवहन समिती सभापती असल्याचे सांगत पालिका मुख्यालयामधील पदाधिकारी केबिन, कल्याणमधील शासकीय विश्रामगृह आणि ठाण्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. 

सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात? 
शिवसेनेची परिवहन सदस्यसंख्या पाहता कल्याण सभापतिपदासाठी लोकसभा मतदारसंघातील तीन; तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एक परिवहन समिती सदस्य इच्छुक आहे. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सभापतिपदाची माळ कल्याण ग्रामीण की कल्याण पश्‍चिमेकडील सदस्यांच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com