कल्याण-डोंबिवलीत उद्या पाणी नाही; KDMC ची माहिती | Water supply update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Supply

कल्याण-डोंबिवलीत उद्या पाणी नाही; KDMC ची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) मोहने उदंचन केंद्राजवळील रॉ वॉटर चॅनेलमधील गाळ काढणे (water channel repairing work) तसेच मोहिली उदंचन केंद्र व मोहिली जलशुद्धीकरण केंद्रास (water purification center) वीजपुरवठा करणाऱ्या उच्चदाब विद्युत फिडरच्या दुरुस्तीचे काम (electricity repairing) करण्यात येणार आहे. या कामासाठी मंगळवारी सकाळी ८ ते रात्री ८ असा १२ तास पाणीपुरवठा बंद (No water supply) राहणार आहे.

हेही वाचा: 'न्यायालयाला धमकी देऊन न्याय मिळत नाही,संप मागे घ्या' - परब

महापालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण, डोंबिवली व ग्रामीण विभागास होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पालिका पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

loading image
go to top