केडीएमटीतील बारा दांडीबहाद्दरांना घरचा रस्ता

संग्रहित
संग्रहित

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमातील (केडीएमटी) महिनोन्‌महिने दांडी मारणाऱ्या १२ वाहक-चालकांना वारंवार सूचना, नोटीस, निलंबन करूनही त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही. अखेर केडीएमटी प्रशासनाने या दांडीबहाद्दरांना कायमस्वरूपी घरचा रस्ता दाखवत सेवेतून कमी केल्याचे जाहीर केले. 

केडीएमटीमध्ये एकूण ६४५ वाहक-चालक असून त्यात काही खासगी ठेकेदाराच्या कर्मचारी वर्गाचा समावेश आहे. खासगीकरणातून बस दुरुस्तीचे काम दिल्याने बऱ्याच बस रस्त्यावर काढण्यात केडीएमटी प्रशासनाला यश आले आहे. यात भिवंडी आणि पनवेल मार्गावर प्रति १० मिनिटाला बस सोडत असल्याने उपन्नातही वाढ झाली आहे. कल्याण ते पनवेल मार्गावर प्रतिदिन दीड लाख, तर कल्याण ते भिवंडी मार्गावर प्रतिदिन ३० ते ३५ हजार रुपये उपन्न मिळत असल्याने केडीएमटीची गाडी रुळावर येत असताना अनेक वाहक-चालक प्रशासनाला पूर्वसूचना न देताच दांड्या मारतात. 

यामध्ये १२ वाहक-चालकांचा समावेश होता. त्यांना प्रशासनाने वारंवार सूचना देऊन, निलंबनाची कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा न होता दांड्या वाढल्याने अशा कामचुकार १२ वाहक-चालकांना केडीएमटी सेवेमधून कमी करत प्रशासनाने घरचा रस्ता दाखवला आहे.

कर्मचारी वर्गात खळबळ
एकीकडे केडीएमटीच्या ताफ्यात बसची संख्या वाढत असताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रस्त्यावर कमी बस धावतात. त्यामुळे उपन्नातही घट होत आहे. याची गंभीर दखल घेत केडीएमटी व्यवस्थापकांनी १ जानेवारी ते २१ सप्टेंबर २०१९ या कालावधीत ९ चालक आणि २३ वाहक अशा ३२ कर्मचारी वर्गाला निलंबित केले. या कर्मचारी वर्गात सुधारणा न झाल्यास आणखी कठोर शिक्षा देण्याचा इशारा प्रशासनाने दिल्याने कर्मचारी वर्गात खळबळ माजली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com