केईएम रुग्णालयातील जखमी प्रिन्सचा दुदैवी मृत्यू 

kem hospital two month old baby prince died due to heart attack
kem hospital two month old baby prince died due to heart attack

मुंबई : मुंबईतील केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात आगलेल्या आगीत जखमी झालेल्या दोन महिन्यांच्या प्रिन्सचा आज दुदैवी मृत्यू झाला. बालकांच्या अतिदक्षता विभागात 6 नोव्हेंबरला आग लागली होती. त्यात प्रिन्सला हात गमवावा लागला होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरूच होते. पण, आज पहाटे अडीचच्या सुमारास प्रिन्सचा मृत्यू झाला. 

काय घडले प्रिन्ससोबत?
राजभर या उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या कुटुंबातील प्रिन्स केईएम रुग्णालयाच्या आगात गंभीर जखमी झाला होता. तो जवळपास 20 टक्के भाजला होता. त्याच्या डाव्या हाताला भाजल्यामुळे त्याचा शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आला होता. त्यानंतर त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. गेल्या सोमवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया करून हात काढून टाकण्यात आला होता. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार प्रिन्सवर उपचार सुरू असताना, आज पहाटे अडीचच्या सुमारास प्रिन्सचं हृदय बंद पडलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. 

आगीचे कारण काय? 
केईएम रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागात ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली होती. त्यात आगातच प्रिन्स जखमी झाला होता. दुदैवाने त्यात त्याला जीव गमवावा लागला.

पोलिस ठाण्यात तक्रार 
प्रिन्सचे वडील पन्नेलाल राजभर यांनी केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणा विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राजभर दाम्पत्याला प्रिन्सला कितपत गंभीर दुखापत झाली आहे, याची माहिती नव्हती. ज्यावेळी त्यांना या घटनेचे गांभीर्य कळाले त्यावेळी त्यांनी मुंबईती भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

आणखी बातम्या वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com