केरळ विधिमंडळात शिवसैनिकांचा निषेध 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

मुंबई - केरळमधील कोची येथे समुद्रकिनारी शिवसेनेच्या तेथील कार्यकर्त्यांनी प्रेमी युगुलांना मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी घडला. त्याचे पडसाद गुरुवारी केरळच्या विधिमंडळात उमटले. विरोधकांनी याचा निषेध करत सभात्याग केला. स्थानिक पोलिस अधिकारी एस. विजयशंकर यांना निलंबित करण्यात आले. हे प्रकरण प्रसिद्धिमाध्यमांनी उचलून धरल्यानंतर शिवसेनेने मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना तत्काळ पक्षातून निलंबित केले आहे. 

कोची येथील मरिन ड्राईव्हवर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी "स्टॉप लव्ह अंडर अंब्रेला' असे लिहिलेले फलक घेऊन प्रेमी युगुलांना बुधवारी मारहाण केली. पोलिसांच्या समोर ही घटना घडली. मुलांना मारहाण करू नका, अशी विनंती पोलिस शिवसैनिकांना करत होते. त्यामुळे त्यांना आणखी चेव चढला. त्यामुळे तेथील पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. घटनास्थळी असलेल्या आठ पोलिसांची सशस्त्र राखीव पोलिस दलात बदली करण्यात आली. केरळच्या विधिमंडळात कॉंग्रेसच्या आमदारांनी स्थगन प्रस्तावाची मागणी केली. ती फेटाळल्यावर त्यांनी सभात्याग केला. त्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. 

या मारहाणीबद्दल युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली. ही लज्जास्पद घटना असल्याचे सांगत अशा कृत्याचे आम्ही समर्थन करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Kerala Assembly Shiv Sena protests